कोरोना काळातील लॉकडाउन नंतर मुंबईतील सर्व उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालय, कार्यालय चालू झाले असून सगळीकडे आता गर्दी वाढू लागली आहे. मुंबईभर फिरून अशाच गर्दीचा फायदा घेत खिसेकापू प्रवाशांचे पैसे, मोबाईल, मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मालाड पोलिसांकडून करण्यात आला आहे. अशाच खिसेकापू टोळीतील २ चोरट्यांना पोलिसांनी मुंबईतील वेगवेगळ्या भागातून पकडून आरोपी विरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे. या आरोपींचा मुंबईतील वेगवगळ्या पोलिस ठाण्यात गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळला आहे.
हे ही वाचा:
कोकणचा सुपुत्र भारताच्या सरन्यायाधीशपदी
गोवंडीत आढळले एकाच कुटुंबातील चार मृतदेह
मोबाईल हातातून निसटला आणि साडेतीन वर्षाची चिमुरडी खाली कोसळली
अजान ऐकून आदित्य ठाकरेंनी थांबवले भाषण
मालाड येथील तरुण २६ जुलै रोजी मालाड ते कांदिवलीच्या दरम्यान प्रवास करीत होता. या प्रवासा दरम्यान चोरांनी तरुणाला घेराव घालून त्याच्या खिशातले साडे सतरा हजार रुपये चोरले. ते पैसे तरुणाने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी ठेवले होते. पैसे खिशातून काढले जात असल्याचे लक्षात येताच रोखण्याचा प्रयत्न केला असता, तरुणाला धक्का देऊन चालत्या बस मधून उडी मारून पळ काढला. ह्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
ही टोळी बसमधील प्रवाशांना, तुमच्या अंगावर किडे आहेत किंवा घाण वास येत आहे, असे सांगून लक्ष विचलित करतात आणि प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूवर हात साफ करतात. अशा तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेतला असता, काही तासातच मनोज इंद्रपाल विश्वकर्मा आणि महादेव वसंत माने या दोघांना पोलिसांनी अटक केली. वेगवेगळ्या तपासामध्ये पोलिसांना या आरोपींचे डझनभर गुन्ह्याची नोंद सापडली असून, राजाराम पाटील उर्फ राजा हा या टोळीचा म्होरक्या असून, त्याच्यावर २० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे, पोलीस राजारामच्या शोध घेत आहेत.