जम्मू-काश्मीर बस हल्ल्यामधील एका दहशतवाद्याचे रेखाचित्र पोलिसांनी केले प्रसिद्ध

माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस

जम्मू-काश्मीर बस हल्ल्यामधील एका दहशतवाद्याचे रेखाचित्र पोलिसांनी केले प्रसिद्ध

जम्मू काश्मीरमधील रियासी येथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात १० भाविकांचा मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते. हल्ल्याच्या दरम्यान बस दरीत कोसळली होती. अशातच आता पोलिसांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. तसेच त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी एका दहशतवाद्याचे रेखाचित्र तयार केले आहे. हे चित्र प्रसिद्ध करण्यात आले असून रियासी पोलिसांनी नुकत्याच बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही उपयुक्त आणि अचूक माहिती दिल्यास २० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

रविवारी, कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिरापासून शिव खोरी मंदिराकडे जात असताना यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या ५३ आसनी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली येथून यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस गोळीबारानंतर खोल दरीत कोसळली, त्यात १० जण ठार आणि ४१ जण जखमी झाले. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने स्वीकारली आहे.तसेच ‘पर्यटक आणि गैर स्थानिकांवर’ अशा आणखी हल्ल्यांचा इशारा दिला आणि रियासी हल्ल्याला “नूतनीकरणाची सुरुवात” म्हटले आहे.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार, १ दहशतवादी ठार

मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री, १२ जूनला घेणार शपथ!

मलावीच्या उपराष्ट्रपतींचा विमान अपघातात मृत्यू!

मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री, १२ जूनला घेणार शपथ!

दरम्यान, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या भागात सुरक्षा मजबूत करण्यात आली असून या हल्ल्याच्या तपासाचे काम राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात आले आहे.दरम्यान, ही बस शिव खोरी मंदिरातून माता वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कॅम्प असलेल्या कटरा येथे परतत असताना ही घटना घडली. जवळच्या जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी वाहनावर हल्ला केला आणि गोळीबार केला.

Exit mobile version