30 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरक्राईमनामाश्रद्धा हत्याकांडप्रकरणी पोलिसांना मिळाला हा पुरावा

श्रद्धा हत्याकांडप्रकरणी पोलिसांना मिळाला हा पुरावा

१८ ऑक्टोबरला आफताबच्या हातात बॅग असलेले सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Google News Follow

Related

श्रद्धा हत्याकांडप्रकरणी पोलिस पुरावे शोधण्यासाठी दिवस-रात्र एक करताना दिसत आहेत. पोलिसांना आफताब पूनावाला याच्याविरोधात ठोस पुरावे हाती लागले आहेत. या पुराव्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना मदत होणार आहे. दिल्ली पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, या फूटेजमध्ये आफताब दिसत आहे. तपासासाठी पोलिस गुरुग्राम येथे गेले असता त्यांनी मेटल डिटेक्टरने तपास केला. मात्र, पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. त्याचबरोबर पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटमधून सर्व कपडे ताब्यात घेतले आहेत. त्यात श्रद्धाच्या कपड्यांचाही समावेश आहे.

पोलिसांनी जप्त केले सीसीटीव्ही फुटेज

तपासात पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा मिळालाय. पोलिसांना आफताब याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून ते १८ ऑक्टोबरचे आहे. या फुटेजमध्ये विकृत आफताबच्या हातात एक बॅग दिसत आहे. आफताब १८ ऑक्टोबर रोजी श्रद्धाच्या मृतदेहाचे उरलेले तुकडे फेकण्यासाठी गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

श्रद्धाच्या मित्रांची चौकशी

दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकरच्या राहुल आणि गॉडविन या दोन मित्रांची चौकशी केली आहे. त्यांच्या चौकशीतून पोलिसाना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. याचा फायदा  पोलिसांना पुढील तपासात उपयोगी ठरणार आहे. दिल्ली पोलिसांचे एक पथक हिमाचल प्रदेशमधील पार्वती खोऱ्यातील तोश गावात पोहचले आहे. येथे पोलिस स्थानिकांची चौकशी करणार आहेत. पोलिस श्रद्धाचा मोबाइल, हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र, श्रद्धाचे कपडे हे तीन पुरावे शोधत आहेत.

गुरुग्राम येथून पोलिस रिकामी हाती परतले

दिल्ली पोलिस गुरुग्रामच्या डीएलएफ फेज२ मध्ये चौकशीसाठी दाखल झाले. तेथे मेटल डिटेक्टरद्वारे त्यांनी शोध घेतला. जंगल, फ्लॅट, मोकळी जागा अशा सर्व ठिकाणी त्यांनी शोधमोहिम राबवली. याशिवाय ते मेहरौलीच्या जंगलात तसेच गुरुग्राम हिमाचल आणि उत्तराखंडच्या जंगलामध्ये पुरावे शोधण्यात गुंतले आहेत.

पोलिसांनी केले आफताब आणि श्रद्धाचे कपडे जप्त

दिल्ली पोलिसांनी आफताबच्या घरात असलेले सर्व कपडे ताब्यात घेतले आहेत. यातील बहुतांश कपडे आफताबचे आहेत. याशिवाय पोलिसांनी श्रद्धाचे कपडेही ताब्यात घेतले आहेत. दोघांचेही कपडे फॉरेंसिक तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. कारण हत्येच्या दिवशी आफताबने कोणते कपडे घातले होते आणि श्रद्धाने कोणते कपडे घातले होते, हे अद्याप पोलिसांना कळलेले नाही. या कपड्यावरून काहीतरी सुगावा लागू शकतो, असे पोलिसांना वाटत आहे.

आजतागायत पोलिसांनी कोणते यश मिळाले

  • दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाची १३ हाडे सापडली आहेत. मात्र, पोलिसांनी अद्यापही श्रद्धाचे डोके सापडलेले नाही. तसेच मोबाईलही जप्त करण्यात यश आलेले नाही. ज्या करवतीने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले तेही सापडलेले नाही.
  • पोलिस अधिकाऱ्यांना, आफताबने ज्या दुकानातून करवत विकत घेतली. त्या दुकानदाराला आजतागायत काहीही सांगता आलेले नाही. ज्या दुकानातून फ्रीज आफताबने विकत घेतला, त्या दुकानाच्या मालकालाही पैसे कोणत्यामार्फत दिले हे आठवत नाहीए.
  • पोलिसांनी आफताबचा फोन जप्त केला आहे.
  • आफताब आणि श्रद्धा यांची भेट झालेल्या बंबल अॅपवरही पोलिस संपर्क करणार आहेत. पोलिस आरोपीच्या आफताबच्या प्रोफाइलची छाननी करणार आहेत. तो अजून कोणत्या मुलींच्या संपर्कात होता का, याचाही शोध पोलिस घेणार आहेत.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा