मालाड पश्चिमेतील एका हॉटेलच्या एका खोलीत बुधवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना सापडली पण ती पोलिसांना दाखविल्यावर मात्र धक्काच बसला.
या कर्मचाऱ्यांना ३९.६४ लाख रुपयाची रोकड मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र या नोटा बोगस असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या खोलीत राहणारे दोन परदेशी नागरिक सकाळीच पळून गेल्यानंतर हा प्रकार उघडलीस आला असून या नागरिकांसाठी खोली बुक करून देणाऱ्या बोरिवलीतील एका ज्वेलर्सला बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे. ७० दशलक्ष डॉलर्स मधून २० टक्के कमिशन मिळवण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटांचे रंगीत झेरॉक्स काढून या परदेशी नागरिकाला दिले होते, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या ज्वेलर्सने पोलिसांनी दिली आहे.
मालाड पश्चिम येथील माइंडस्पेस येथील हॉटेलमध्ये कॅमेरूनचे नागरिक असलेल्या झोन पॅसिफिक आणि फ्रँक स्टीफन यांनी मंगळवारी हॉटेलमध्ये चेक इन केले, पण दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलला न कळवता ते निघून गेले होते. या दोघांना हॉटेलची खोली बुक करून देणाऱ्या बोरिवली येथील ज्वेलर्स तरुण कच्छवा (२९) याला हॉटेल व्यवस्थापक फोन करून तुमचे गेस्ट खोलीवर नाहीत ते येणार आहेत का असे विचारले असता कच्छवा यांनी त्यांना सांगितले की ते परत येणार नाही.
व्यवस्थापनाने कच्छवा याला सांगितले कि, सफाई कर्मचाऱ्यांना पैशांनी भरलेली बॅग सापडली त्याने त्या नोटा बोगस असून त्या फेकून देण्यास सांगितले. हॉटेल व्यवस्थापकाने बांगूर नगर पोलिसांना कळवले असता पोलिसांनी हॉटलवर येऊन नोटा जप्त केल्या आणि कच्छवाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत धक्कादायक बाब समोर आली.
बोरिवली येथे राहणाऱ्या आणि मालाडमध्ये ज्वेलरीचे दुकान असणाऱ्या कच्छवा यांच्याशी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाद्वारे कॅमेरून नागरिकांची ओळख झाली होती. दोघांनी त्याला संपर्क साधला होता, त्यांनी त्याला सांगितले की ते देखील त्याच उद्योगात आहेत आणि त्याच्याबरोबर व्यवसाय करायला इछुक आहे. त्यांनी कच्छवांना सांगितले की त्यांच्याकडे ७० दशलक्ष ( ७ कोटी) आहेत. परंतु डॉलरमध्ये एक विशेष प्रकारची शाई आहे.
शाईपासून मुक्त होण्यासाठी, प्रत्येक डॉलरला २००० रुपयांच्या नोटात चार तास गुंडाळणे आवश्यक आहे, त्यांनी त्याला सांगितले आणि जर त्याने त्याला २००० रुपयांच्या नोटा पुरवल्या तर ७० दशलक्ष डॉलरमध्ये २० टक्के कमिशन देण्याचे आश्वासन दिले.
हे ही वाचा:
खादी व ग्रामोद्योग लेहमध्ये फुलवणार हिरवळ
प्राणवायू प्रकल्पाच्या कामात एकाच कंत्राटदारात अडकला जीव
सायबरमधून अर्ज भरताय, मग विद्यार्थ्यांनो खिसा खाली करा!
बिहारमधील १६ जिल्ह्यांना पुराचा फटका
पॅसिफिक आणि स्टीफन ६ ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल झाले आणि गोरेगाव येथील हॉटेलमध्ये थांबले आणि नंतर मालाड हॉटेलमध्ये गेले. कच्छवाच्या दागिन्यांच्या दुकानात शाई काढण्याची चाचणी घेण्यात आली आणि दोघांनी त्याला अधिक नोटांची व्यवस्था जलद करण्यास सांगितले. त्याच्याकडे तेवढी रोख रक्कम नसल्याने कच्छवा यांनी २००० रुपयांच्या नोटांमध्ये सुमारे ३९.६४ लाख रुपये रंगीत झेरॉक्स छापून त्या दोघांना दिले. मात्र, त्यांना संशय आला आणि ते पळून गेले, अशी माहिती समोर आली.
आम्ही तरुण कच्छवा यांना शुक्रवारी अटक केली आणि त्याने कबुली दिली. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे, ”एका अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही दोघांचा शोध घेत आहोत, असेही ते म्हणाले.