पोलीस भरती -लेखी परीक्षेत डिव्हाइसच्या सहाय्याने देणार होता पेपर

ठाण्याच्या सरस्वती विद्यामंदिरमध्ये घडली घटना

पोलीस भरती -लेखी परीक्षेत डिव्हाइसच्या सहाय्याने देणार होता पेपर

राज्यभरात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे, पोलीस भरतीची मैदानी चाचणी संपली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील परीक्षा केंद्रात पोलीस भरती लेखी परीक्षा सुरू आहे. लेखी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून अनेक उपाय केले गेलेले असताना देखील उमेदरवाराकडून गैरप्रकार सुरू असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत.

ठाणे पोलीस भरती लेखी परिक्षेदरम्यान देखील असाच एक गैरप्रकार समोर आला आहे. ठाण्यात पोलीस भरती लेखी परीक्षेत डमी उमेदवाराकडून मोबाईल डिव्हाईस आणि ब्लुट्युथ डिव्हाईस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिर या ठिकाणी ठाणे पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरू आहे. सोमवारी या परीक्षेदरम्यान एक उमेदरवाराची ‘एचएचएमडी’या मशीन द्वारे तपासणी सुरू असताना त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असल्याची समोर आले.

हे ही वाचा:

दादरमध्ये बब्बर शेअर टॅक्सीवाले, पादचाऱ्यांची शेळी

मारहाणीचे राजकारण करण्यासाठी ठाण्यात सगळे ठाकरे एकवटले

अडीच वर्षांच्या कारभारावरून फडतूस कोण हे लोकांना ठाऊक आहे!

सिक्कीममधील नाथुलाजवळ हिमस्खलन,६ पर्यटकांचा मृत्यू

तपासणी दरम्यान पोलिसांना त्याच्या गुडघ्याला असलेल्या बँडेड मध्ये मोबाईल डिव्हाईस आणि ब्ल्यूट्युथ डिव्हाईस मिळून आले. पोलिसानी त्याच्या जवळील ओळखपत्र तपासले असता त्याच्यावर बालाजी बाबू कुसळकर लिहण्यात आले होते व फोटो देखील दुसऱ्या तरुणाचा होता, पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव विकास आंबरसिंग जोनवाल राहणार छत्रपती संभाजी महाराज नगर असे सांगितले. त्याला डमी उमेदवार म्हणून बालाजी कुसळकर याने दहा हजार रुपये दिले होते.

मोबाईल डिव्हाईस च्या मदतीने तो प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून बालाजी याला पाठवणार होता व बालाजी त्याला कॉल करून प्रश्नाचे उत्तर सांगणार होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी बालाजी कुसळकर आणि विकास आंबरसिंग जोनवाल या दोघांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

 

Exit mobile version