गहाळ झालेल्या, चोरीला गेलेल्या अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. तपासादरम्यान सायबर पोलिसांना मोबाईल, लॅपटॉप अशा ३०० वस्तूंचा शोध घेण्यात यश आले आहे. गेल्या तीन महिन्यांत सापडलेल्या या वस्तूंची किंमत ५८ लाख असून उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, केरळ आणि दुबई इथून या वस्तूंचा शोध घेण्यात आला आहे. चोरीला गेलेला किंवा गहाळ झालेला मोबाईल वा लॅपटॉप परत मिळण्याची आशा नसताना अनेकांना या वस्तू त्यांच्या मालकांना परत करण्यात आल्या आहेत.
गहाळ झालेल्या वा चोरी झालेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने मोबाईलचा शेवटचा वापर करणाऱ्या व्यक्तीला संपर्क करून वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे सांगून त्यांच्यामार्फत पोलिसांनी अनेक वस्तू परत मिळवल्या. या वस्तूंपैकी अनेक वस्तू या वापरकर्त्यांना रस्त्यावर आणि इतरत्र सापडल्या आहेत, तर काहींनी अजाणतेपणी चोरांकडून खरेदी केल्या आहेत. पोलिसांनी शोधलेल्या मोबाईलबद्दल मध्य व पश्चिम विभागात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
ही वाचा:
देवी पावली…अखेर महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार
‘केंद्र सरकारने जे केले ते कोणताही देश करू शकत नाही’
४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट
भारताशी संबंध दृढ करण्यातच अमेरिका आणि फ्रान्सचे हित
मुंबईतील उर्वरित तीन प्रादेशिक परिमंडळातील मोबाईल आणि लॅपटॉप आशा वस्तूंचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ताडदेव येथील एका राहिवाश्याने उत्तर प्रदेशमधील आपल्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल करता यावा म्हणून दोन वर्षे पैसे जमा करून मोबाईल खरेदी केला होता. मोबाईल चोरीला गेल्यावर मोबाईल परत मिळेल अशी आशाच त्यांनी सोडली होती. पण आता मोबाईल परत मिळाल्यामुळे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना आनंद व्यक्त केला.