गुन्ह्यांची संख्या जास्त, पण उकल कमी; नागरिकांमध्ये चिंता

गुन्ह्यांची संख्या जास्त, पण उकल कमी; नागरिकांमध्ये चिंता

प्रत्येक महिन्याला हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, अपहरण, चोऱ्या तसेच फसवणूक असे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल होत असतात. प्रत्येक महिन्यात गुन्ह्यांची संख्या वाढत असताना गुन्हे उकल होण्याचे प्रमाण जेमतेमच आहे. जानेवारी ते जून या महिन्यांमध्ये दर महिन्यात केवळ ५५ टक्के गुन्ह्यांची उकल झाली असून केवळ फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण ५८ टक्के होत. जास्तीत जास्त गुन्ह्यांची उकल होत नसल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल केले जातात त्यात चोरीच्या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. मात्र चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण कमी आहे. प्रत्येक महिन्याला २० ते २५ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश येत आहे. दरमहा हत्येच्या सर्व गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून केली जात आहे. अपहरणाच्या गुन्ह्यांचे उकल होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

हे ही वाचा:

दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंविषयी बोलू नये

बैल गेला नि झोपा केला

भारताने बनवली जगातील पहिली डीएनए लस

पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन

फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यांची मोठ्या संख्येने नोंद केली जाते, परंतु त्यांची उकल होण्याची टक्केवारी खूपच कमी आहे. लोकांना गंडा घालणारे अद्याप मोकाट असल्यामुळे फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नोंद होणाऱ्या गुन्ह्यांपेक्षा अर्ध्याच गुन्ह्यांची उकल होत असल्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश येणार कसा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

जानेवारी महिन्यात ८७८ गुन्ह्यांची नोंद दाखल झाली होती त्यापैकी ४८२ गुन्ह्यांची म्हणजेच ५५ टक्के गुन्ह्यांची उकल झाली. फेब्रुवारी महिन्यात ७९६ गुन्ह्यांची नोंद झाली होती त्यापैकी ४६२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. फेब्रुवारीमधील गुन्ह्यांचे उकल करण्याचे प्रमाण ५८ टक्के इतके होते. मार्च महिन्यात ५६ टक्के, एप्रिलमध्ये ५४ टक्के, मे महिन्यात ५२ टक्के, जूनमध्ये ५४ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

Exit mobile version