नाश्ता देण्याच्या ऑर्डरवरुन पोलिसांनी केला बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश 

मुंबई पोलिसांनी शहराच्या जवळ असलेल्या राजोरी बीच परिसरात बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई केली आहे.

नाश्ता देण्याच्या ऑर्डरवरुन पोलिसांनी केला बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश 

close up focus on call center headset device at VOIP system on telephone machine with virtual interface of communication at office desk for hotline telemarketing and network operation concept

मुंबई पोलिसांनी शहराच्या जवळ असलेल्या राजोरी बीच परिसरात बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई केली आहे. या बनावट कॉल सेंटरवर कारवाई करत पोलिसांनी ४७ जणांना अटक केली आहे. तसेच मोठा डेटा देखील पोलिसांनी कारवाई दरम्यान जप्त केला आहे. केवळ नाश्ता देण्याच्या ऑर्डरवरुन मुंबई पोलिसांनी या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. 

मुंबई शहराच्या बाहेर असलेल्या राजोरी बीच या भागात सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांची मोठी गर्दी असते, पण इतर वेळी मात्र हे ठिकाण निर्जन असतं. त्यामुळे या ठिकाणी काहीतरी अवैध गोष्ट सुरू असल्याचा पोलिसांना संशय आला. माहिती पक्की होताच पोलिसांनी या जागेवर लक्ष ठेवणे सुरू केले होते.

या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना संबंधित बिल्डिंग सोडून जाण्याची मनाई होती आणि बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधण्यास देखील बंदी घालण्यात आली होती. पण, या सेंटरमधील कर्मचाऱ्यांसाठी रोज पहाटे चार वाजता जवळच्या एका हॉटेलमध्ये नाश्त्याची ऑर्डर दिली जायची.

या बनावट कॉल सेंटरवर कारवाई करत पोलिसांनी 47 जणांना अटक केली असून मोठा डेटा जप्त केला आहे. या कॉल सेंटरमधून जवळच्या एका विशिष्ट हॉटेलमधून पहाटे चार वाजता नाश्ता ऑर्डर केला जायचा. त्या आधारे पोलिसांनी माग घेतला. मुंबई शहराच्या बाहेर असलेल्या राजोरी बीच या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली.

अनेक दिवसांपासून दररोज पहाटे देण्यात येत असलेल्या ५० ते ६० चहा-नाश्त्याच्या ऑर्डरमुळे पोलिसांच्या संशयाला बळ मिळाले. त्यानंतर पोलिसांनी या सेंटरवर छापा टाकून मालकासह ४७ कर्मचाऱ्यांना अटक केली.

त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणूक, तोतयागिरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सेंटरमधील जप्त केलेल्या संगणकांचीही फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

सव्वा तीन लाख ‘मोदी मित्र’ मुस्लिमबहुल मतदारसंघात करणार प्रचार

सहा महिने वाट न पाहताही घटस्फोट दिला जाऊ शकतो

केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक , पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी

‘महाविकास आघाडीला शरीया कायदा लागू करायचा आहे’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचार्‍यांना ऑस्ट्रेलियातील संशयित बँक ग्राहकांचे कॉल रिसिव्ह करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता असून पोलिस त्याचा तपास करत आहेत.

Exit mobile version