चीनशी संबंधित एका टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

चीनशी संबंधित एका टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलच्या IFSO युनिटने आंतरराष्ट्रीय ठग आणि खंडणीखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिल्ली, जोधपूर आणि गुरुग्राममधून आठ जणांना अटक केली आहे. या टोळीचा थेट चीनशी संबंध असून ही टोळी अतिशय संघटित पद्धतीने लोकांकडून पैसे उकळत असे, असे पोलिसांनी सांगितले आहे. या टोळीची पोलिसांनी २५ हून अधिक बँक खातीही गोठवली आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून १६ डेबिट कार्ड, २२ चेकबुक आणि २६ पासपोर्ट जप्त केले आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना कर्ज देतो असे सांगून ही टोळी अनेक लोकांना लक्ष्य करत असे. त्यानंतर ही टोळी लक्ष्य केलेल्या लोकांचे मोबाईल हॅक करून त्यामध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत आणि त्यानंतर त्याचा वैयक्तिक डेटा मिळवत असे. अशा प्रकारे हे टोळके पीडितांकडून पैसे उकळायचे. काही वेळा ही टोळी महिलांच्या फोटोशी छेडछाड करून खंडणी उकळत असे. तसेच ही टोळी विविध देशांतून क्रिप्टोकरन्सीद्वारे पैशांची उलाढाल करत असे. या टोळीत आणखी तीन चिनी नागरिकांचा सहभागही समोर आला आहे.

चीनमध्ये बसलेल्या टोळीच्या म्होरक्याला क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे पोहोचवले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीशी संबंधित असलेल्या तीन चिनी नागरिकांचाही पोलिसांनी शोध घेतला आहे. या तीन चिनी नागरिकांच्या खात्यात क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणूक आणि खंडणीच्या माध्यमातून गोळा केलेले पैसे चीन, हाँगकाँग आणि दुबई येथे हस्तांतरित केल्याचे तपासादरम्यान पोलिसांना समोर आले आहे.

हे ही वाचा:

काश्मीर फाईल्स विरोधात पुन्हा शरद पवारांची मळमळ

शिवसेना नेत्याच्या तक्रारीमुळे, राष्ट्रवादीचा आमदार ईडीच्या रडारवर

शरद पवारांना झोंबले राज ठाकरेंचे भाषण

गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारत ऑस्ट्रलियन महिलांनी सातव्यांदा उचलला विश्वचषक

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार या टोळीने आतापर्यंत अनेक कोटींची रक्कम लोकांकडून उकळली आहे. एका आरोपीच्या खात्यातून आतापर्यंत पोलिसांना ८.२५ कोटी रुपये सापडले आहेत. यासोबतच या टोळीच्या आणखी 25 खात्यांचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Exit mobile version