27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामायेशू भेटण्याच्या अंधश्रद्धेतून केनियात २१ जणांचा मृत्यू

येशू भेटण्याच्या अंधश्रद्धेतून केनियात २१ जणांचा मृत्यू

गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चचा पादरी पॉल मॅकेन्झी नाथेंग याला पोलिसांनी अटक केली आहे.

Google News Follow

Related

उपाशी राहून स्वत:ला पुरले तर येशूची भेट होईल आणि तुम्हाला स्वर्ग मिळेल या एका ख्रिश्चन धर्मगुरूचा उपदेश ऐकल्यामुळे २९ जणांना जीवाला मुकावे लागले आहे. आफ्रिकेतल्या केनियामध्ये एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेतून २९ जणांनी उपाशीपोटी सामूहिक आत्महत्या करण्याची घटना घडली आहे. किल्फी प्रांतातील शाकाहोला जंगलातून पोलिसांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

तीन दिवसांपासून या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चच्या पादरीने उपाशी राहून स्वतःला पुरले तर ते येशूला भेटतील आणि स्वर्गात जल असे लोकांनां सांगितले होते. केनियाच्या पोलिसांनी आतापर्यंत २१ मृतदेह बाहेर काढले आहेत. या मृतदेहांमध्ये मृत मुलांचाही समावेश आहे. शाकाहोल जंगलात आणखी मृतदेह सापडतील असे पोलिसांना वाटत आहे.

या जंगलात पोलिसांना कबरी देखील सापडल्या आहे. गेल्या आठवड्यात याच ठिकाणी गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चच्या १७ सदस्यांना वाचवण्यात आले. हे सर्वजण उपाशी मरण्याची वाट पाहत होते. पोलिसांनी त्यांची सुटका केली तेव्हा ते कुपोषित दिसत होते आणि भुकेमुळे त्यांची अवस्था बिकट होती. आपण मॅकेन्झी आणि चर्चचा अनुयायी असल्याचे या सदस्यांनी सांगितले. गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चचा पादरी पॉल मॅकेन्झी नाथेंग याला पोलिसांनी अटक केली आहे.

मॅकेन्झी याने कोणतेही गैरकृत्य केल्याचा इन्कार केला आहे.आपण लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नाही, असे तो सांगत आहे. आपण २०१९ मध्येच चर्च बंद केले असल्याचा दावा पॉल मॅकेन्झी नाथेंग याने केला आहे. पण पोलिसांनी त्याला जामिनावर सोडण्यास नकार दिला आहे. केनियातील दैनिक द स्टँडर्डच्या म्हणण्यानुसार पॅथॉलॉजिस्ट डीएनए नमुने घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पीडितांचा उपासमारीने मृत्यू झाला की नाही हे निश्चित होईल असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

आता ‘वॉटर मेट्रो’ने घ्या केरळच्या बॅक वॉटरचा आनंद

पंतप्रधानांना आत्मघाती बॉम्ब हल्ल्याचे धमकी पत्र लिहिणारा  पोलिसांच्या जाळ्यात

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

घरच्या मैदानात अजित पवारांनी केली मुख्यमंत्री पदाची दावेदारी…

शोध सुरू असताना पोलिसांना जवळच्या जंगलात सामूहिक कबरी सापडल्या. त्यानंतर १३ एप्रिल रोजी हे प्रकरण उघडकीस आले. गेल्या महिन्यातच पादरी मॅकेन्झी यांना दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. यापूर्वीही सप्टेंबर २०१७ मध्ये पोलिसांनी द गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चवर छापा टाकून सुमारे ९३ मुलांची सुटका केली होती. यावेळी पास्टर मॅकेन्झीसह इतर काही धर्मोपदेशकांनाही अटक करण्यात आली. पादरी मॅकेन्झी यांच्यावर धर्मांधतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा