महादेव बेटिंग ऍपप्रकरणी ७० जण ताब्यात

नारायणगावातील एका इमारतीत ऍपचे काम सुरू असल्याचे उघड

महादेव बेटिंग ऍपप्रकरणी ७० जण ताब्यात

महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या नारायणगावमध्ये पोलीसांनी छापेमारी करत तब्बल ७० जणांना ताब्यात घेतले आहे. महादेव बेटिंग प्रकरण समोर आले तेव्हा देशातील विविध राज्यांसह परदेशातही कारवाई करण्यात आली होती. आता याच प्रकरणी नारायणगावात पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र कनेक्शन उघड केले आहे.

महादेव ऑनलाईन बेटिंग प्रकरणी परदेशासह देशातील काही राज्यांमध्ये छापेमारी करत कारवाई करण्यात आली होती. यादरम्यान, महादेव ऑनलाइन बेटिंग ऍपचे काम पुण्याच्या नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती समोर आली. यानंतर पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव येथे छापेमारी केली आहे. नारायणगावातील एका इमारतीत या ऍपचे काम सुरू असल्याचे समोर आले. या प्रकरणात ७० ते ८० जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. ही संपूर्ण इमारत महादेव ऍपच्या कामासाठी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

‘मोदींसारखा नेता पाकिस्तानलाही मिळावा’

चिनी फंडिंगचे आरोप असलेल्या ‘न्यूज क्लिक’च्या संपादकांची अटक अवैध

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने गोळी झाडून केली आत्महत्या!

दिल्लीच्या विजयामुळे राजस्थान प्लेऑफमध्ये!

ईडीच्या विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग ऍपवर बंदी घातली आहे. महादेव बेटींग ऍप प्रकरणात अनेक कलाकारांची नावे देखील समोर आली होती. या ऍपचा संस्थापक सौरभ चंद्राकरने मित्रासोबत ऑनलाईन ऍप सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. सौरभ चंद्रकारचा फेब्रुवारी २०२३ मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. त्याच्या शाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी हजर होते. या लग्नाच्या खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं मोठं नेटवर्क उघड झाले. या संदर्भात ईडीने अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स देखील बजावले होते आणि चौकशीसाठी हजर राहण्यासही सांगितलं होते.

Exit mobile version