ठाणे कारागृहातील पोलीस शिपाई अशोक पल्लेवाड बेपत्ता; भ्रष्टाचाराविरोधात उठविला आवाज

ठाणे कारागृहातील पोलीस शिपाई अशोक पल्लेवाड बेपत्ता; भ्रष्टाचाराविरोधात उठविला आवाज

ठाणे कारागृहातील पोलिस शिपाई अशोक पल्लेवाड यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला असून त्या त्यांनी कारागृहातील भ्रष्टाचार, अधीक्षक हर्षद अहीरराव यांची मनमानी याविरोधात व्हीडिओच्या माध्यमातून तक्रार केली आहे. पण आता हे शिपाई पल्लेवाड बेपत्ता आहेत. व्हीडिओ केल्यानंतर ते घरी परतलेले नाहीत.

अशोक पल्लेवाड यांनी ठाण्याचे जेल अधीक्षक हर्षद अहिरराव यांच्याविरोधात एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओत पोलीस शिपाई अशोक पल्लेवाड यांनी अहिरराव यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पल्लेवाड यांनी व्हीडिओत म्हटले की, मला ३ वर्षे झाली. अधीक्षक हर्षद अहीरराव कारागृहातील भ्रष्टाचाराबद्दल मी बोलतो आहे. मी आवाज उठवला बांधकाम विभागाची माहिती मागितली असता मला दिली गेली नाही. अधीक्षक खोटे काम काढतात व बिले पास करून घेतात. कैद्याकडून काम करून घेतात व पैसे शासनाकडून घेतात. अधीक्षकांविरोधात मी आवाज उठविल्यामुळे मला आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. कैद्याकडून मारण्याची धमकी दिली जात आहे. इतर कर्मचाऱ्याला सांगितले जात आहे की, माझ्याशी बोलायचे नाही. मला एकटे पाडले जात आहे. खालच्या दर्जाची वागणूक दिली जात आहे. मला समजून न घेता मानसिक छळ करत आहे. मी कळवत आहे की, कारागृहात शिपाई अमोल माने याने वरिष्ठांच्या जाचाला कळवून आत्महत्या केली. म्हणून या प्रकरणाची चौकशी करावी आणि मला न्याय द्यावा.

आरोप करणारे पोलीस शिपाई अशोल पल्लेवाड हे शनिवारी पहाटे घरातून कामावर जाण्यासाठी निघाले त्यानंतर ते परतले नाहीत अस त्यांच्या पत्नीने माहिती दिली आहे. त्यांच्या पत्नी ममता पल्लेवाड यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दिली आहे. जेल अधिक्षकांच्या विरोधात व्हिडिओ बनवल्यानंतर अशोल पल्लेवाड बेपत्ता झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

हे ही वाचा:

हरियाणवी गायिकेची हत्या, दोघांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर चर्चेत

डावा भाट इरफान ‘मुघलाई’…

‘महाराष्ट्रात पेट्रोलवर कर जास्त तरीही महागाईवरून ओरड’

 

Exit mobile version