भायखळा कारागृहाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.
ताडदेव लोकल आर्म युनिट २ मधील श्याम वरगडे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.त्याची नियुक्ती भायखळा जेलच्या गेटवर होती. रात्री ८.२० वाजता त्याने एसएलआरमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली.
हे ही वाचा:
मुस्लीम सांगा कुणाचे? मतदारांना औरंग्याच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न…
भजन ऐकत अयोध्येत करा डबल डेकर क्रूझने सफर
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी
उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ राजीनाम्यामुळे झाली अडचण
नागपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याला नायर रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.