एकट्या पोलिसाने कोयता घेऊन हप्ते वसुली करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

पोलीस हवालदार संभाजी जाधव यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक

एकट्या पोलिसाने कोयता घेऊन हप्ते वसुली करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

कोयता हातात घेऊन भरबाजारात फेरीवाले आणि दुकानदाराकडून हप्ते वसुली करणाऱ्या गुंडाच्या एकट्या पोलीस हवालदाराने जीवाची पर्वा न करता मुसक्या आवळल्या आहे.पोलीस हवालदार संभाजी जाधव यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून वरिष्ठ अधिकारी यांनी देखील त्यांची दखल घेऊन त्याचे कौतुक केले आहे.

तमिळ आरसन उर्फ वेल्लू जयपाल हरिजन (२५) असे या गुंडाचे नाव असून तो मुलुंड पश्चिम अंबिका नगर परिसरात राहण्यास आहे. तामिळ हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याची परिसरात दहशत आहे.शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तामिळ हा हातात कोयता आणि सुरा घेऊन भरबाजारात दुकानदार, फेरीवाले, आणि रिक्षाचालक यांना कोयत्याचा धाक दाखवून धमकावत असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संभाजी जाधव यांना एका दुकानदाराने फोन करून दिली. साध्या वेशात असलेले हवालदार संभाजी जाधव यांनी अंबिका नगर येथील बाजारात धाव घेतली.

हे ही वाचा:

सुशांत सिंगचे घर विकत घेणार अदा शर्मा?

सीबीआय चौकशी सुरू असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या

अमेरिकेत फुटबॉल सामन्यादरम्यान गोळीबार

मादागास्करमधील स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२ लोकांचा मृत्यू

तामिळ या गुंडाने एका फेरीवाल्याच्या कमरेला कोयता लावून त्याच्याकडे पैसे मागत होता, जाधव यांनी ग्राहक बनून त्या फेरीवाल्याकडे गेले आणि वेळ दडवता तामिळ या गुंडाच्या पायावर लाथेने प्रहार करून त्याला खाली पाडले आणि त्याच्या हातातील कोयता आणि सुरा ताब्यात घेऊन तामिळच्या मुसक्या आवळत पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
मुलुंड पोलिसानी तामिळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 

पोलीस हवालदार संभाजी जाधव यांनी गुंडाच्या मुसक्या आवळलेला आणि गुंडाचा कोयता घेऊन फिरणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संभाजी जाधव यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून वरिष्ठ पोलीस आधिकरी यांनी देखील जाधव यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

Exit mobile version