इमारतींच्या बांधकामासाठी लागणाऱ्या सीमेंट आणि फायबर विटांच्या खाली लपवून कोट्यवधी रुपयांचे मद्य मुंबईत आणण्याचा डाव मुंबई उत्पादन शुल्क विभागाच्या जागरुकतेमुळे उधळला गेला. पनवेल येथे असा ट्रक पकडण्यात आला. त्यातून हे बेकायदा मद्य आणले जात होते.
गोव्यातून असे मद्य भरलेला ट्रक आणला जात होता. सिमेंट आणि फायबर विटांच्या खाली हे मद्य ठेवण्यात आले होते. खबर लागल्याप्रमाणे हा ट्रक अडविण्यात आला आणि त्यातून हा तस्करी करण्यात येत असलेला माल जप्त करण्यात आला.
हे ही वाचा:
आव्हाडांचे घालीन लोटांगण कशासाठी?
पुढल्या वर्षांपासून मेट्रो नऊ सुरु होणार
ठाकरे, नवाझुद्दीनच्या भेटीचे ‘राज’ ?
सीबीआयकडून निवृत्त न्यायमूर्तींचा भ्रष्टाचार उघड
उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी पाठलाग करून ही दारू पकडली आणि यात सामील असलेल्यांना अटक केली. गोव्यातून हे मद्य आणले जात होते आणि ते १ कोटी रुपये किमतीचे होते. यासंदर्भात ३ जणांना अटक करण्यात आली. मुंबईत विकण्याकरिता ही दारू आणली जात होती. त्यातून मोठा नफा कमावण्याचा उद्देश होता. त्यासाठी जवळपास १ हजार ३०० बॉक्स भरून ही दारू आणली गेली.