वन अविघ्न पार्क इमारत आगप्रकरणी गुन्हा दाखल

वन अविघ्न पार्क इमारत आगप्रकरणी गुन्हा दाखल

करीरोड येथील ‘वन अविघ्न’ या गगनचुंबी ६० मजली इमारतीच्या १९व्या मजल्यावर लागलेल्या आग प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. इमारतीचे मालक, भोगवटादार आणि आग नियंत्रण व्यवस्थापक कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या करीरोड मधील भारतमाता सिनेमागुहा जवळ असलेल्या ६० मजली गगनचुंबी इमारत ‘वन अविघ्न पार्क’ च्या १९ व्या मजल्यावरील एका फ्लॅट मध्ये फर्निचर हे काम सुरू असताना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत तेथील सुरक्षा रक्षक अरुण तिवारी याचा मृत्यु झाला होता. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अग्निशमन दलाकडून अडकलेल्या १६ जणांचे सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी रात्री उशिरा काळाचौकी पोलिसानी इमारतीचे मालक, भोगवाटादार, इमारतीची अग्नीशमन नियंत्रण व्यवस्थापक कंत्राटदार यांच्या विरुद्ध एकाच्या मृत्यूस कारणीभूत, निष्काळजीपणा चा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांनी दिली आहे.

 

हे ही वाचा:

‘NobindiNoBusiness’ हॅशटॅगने सुतकी दिवाळी जाहिरातींना दिला दणका

मास्क न घालणारे राज ठाकरेच कोरोनाग्रस्त

काकांच्या मांडीवरून भगव्याचा अपमान दिसत नसावा

धक्कादायक! अल्पवयीन मुलाने पत्नीलाच विकले

 

शुक्रवारी सकाळी या इमारतीला अचानक आग लागल्याचे स्पष्ट झाले. थोड्याचवेळात आगीच्या ज्वाळांनी १९वा मजला वेढला गेला आणि झपाट्याने आग वरच्या मजल्यांवर पसरू लागली. पण अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करत आग विझविली. मात्र ही आग लागल्यानंतर ती पाहण्यासाठी गेलेला सुरक्षा रक्षक अरुण तिवारी स्वतःच्या बचावासाठी गॅलरीत उतरलेला असताना खाली कोसळून मृत्युमुखी पडला.

Exit mobile version