आरोपींना अटक करत असताना आरोपींनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केल्याने पुणे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे जखमी झाले आहेत. कृष्ण प्रकाश यांना किरकोळ जखम झाली असून काही ठिकाणी खरचटले आहे. आरोपींना पकडताना ही झटापट झाल्याने कृष्ण प्रकाश हे जखमी झाले. एका गुन्ह्यातील आरोपींबद्दल पुणे पोलीस आयुक्तांना माहिती मिळाली होती.
आरोपी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोये, कुरंकुडी येथे असल्याची गुप्त माहिती कृष्ण प्रकाश यांना मिळाली होती. त्यानंतर कृष्णप्रकाश यांनी वेगवेगळे चार पथक तयार करून या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता एका शेताच्या कडेला असलेल्या घराच्या बाजूला आरोपींची काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली दुचाकी झाडीमध्ये उभी असलेली दिसली.
या कारवाई दरम्यान घरात तीन आरोपी असल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी छापा मारला असता हे तीनही आरोपींनी पाळण्याचे प्रयत्न केले. तेव्हा आरोपींनी पोलिसांच्या पथकांवर गोळीबार केला. एका पथकावर एका आरोपीने एक राउंड फायर केला आणि दुसऱ्या एका आरोपीने दुसऱ्या पथकावर गोळीबार केला.
हे ही वाचा:
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षांची निवड?
ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वापर भारतविरोधी राष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी
१५-१८ वयोगटातील मुलांची १ जानेवारीपासून करा नोंदणी
महात्मा गांधी अवमानप्रकरणी कालीचरण महाराजांवर गुन्हा
पोलिसांकडूनही आरोपींच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. आरोपी पळून जात असताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हजरजबाबीपणा दाखवत आरोपींच्या अंगावर झाड उचलून टाकले आणि त्यावेळी इतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. या झटापटीत कृष्ण प्रकाश हे किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, तीनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.