29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामावेटर आणि वॉचमन बनून पोलिसांनी बंटी-बबलीवर टाकली झडप

वेटर आणि वॉचमन बनून पोलिसांनी बंटी-बबलीवर टाकली झडप

पोलिसांनी शिताफीने केली अटक

Google News Follow

Related

उपनगरात घरफोड्या करून एका हॉटेलच्या खोलीत दडून बसलेल्या बंटी बबलीला मुद्देमालासह अटक करण्यासाठी पोलिसांना वेटर बनावे लागले. वेटर बनलेल्या पोलिसांनी अचूक वेळ साधत बंटी बबली या जोडप्यावर झडप टाकून त्यांना अटक केली आहे.

नेहरू नगर पोलिसांनी या दोघांना घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याजवळून चोरी केलेला ऐवज जप्त केला आहे. सौरव देवशरण यादव (२४) आणि शाहिनी सौरव यादव (२२) असे अटक करण्यात आलेल्या बंटी आणि बबलीचे नाव आहे. हे दोघे पतीपत्नी असून नवी मुंबईतील सानपाडा येथे राहण्यास आहेत. चेंबूर येथील शेल कॉलनी येथे राहणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या आणि इतर दोन असे तीन घरे या बंटी बबलीने साफ केली होती. सुमारे ४ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज या दोघांनी चोरी केला होता.

चोरीच्या ऐवजासह पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याची या दोघांची योजना होती.  तत्पूर्वी या दोघांनी घाटकोपर पूर्व छेडा नगर येथील हर्षा लॉजींग व बोर्डिंग या हॉटेलमध्ये रूम घेतली होती आणि तिथे ते  राहत होते. नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हा प्रकटीकरण पथकाला या दोघांचा सुगावा लागला होता, मात्र पोलिसांना बघून हे दोघे पळून जातील यासाठी नेहरू नगर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी यांनी या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यासाठी वेटर आणि वॉचमन बनण्याची योजना आखली. मंगळवारी दुपारी पोलिसानी हॉटेल व्यवस्थापकांना विश्वासात घेतले.

हे ही वाचा:

टीम इंडिया यत्र तत्र सर्वत्र!

संवाद तुटला नात्यांचा खून

बोगस लिपिक भरती.. धनंजय मुंडे यांच्या नावे मंत्रालयात घोटाळा

वरळीत ४२व्या मजल्यावरून कोसळले सिमेंटचे ब्लॉक; दोन जणांचा मृत्यू

हे दाम्पत्य हॉटेलमध्ये थांबलेले असल्याची खात्री केली. पोलीस पथकाने हॉटेलच्या वेटरचे तसेच वॉचमनचे कपडे घालून या दांपत्यावर पाळत ठेवली. हे दोघे खोलीवर येताच वेटर आणि वाचमनच्या वेशात असलेल्या पोलिसांनी या दोघांवर झडप टाकून त्यांना चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, हे दोघे मंगळवारी सकाळीच हॉटेलची खोली सोडून पश्चिम बंगाल येथे पळून जाणार होते, अशी माहिती त्यांनी चौकशीत दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा