वेबसिरीजच्या नावाखाली सुरू होता देहव्यापार; दोन मॉडेलसह तिघींची सुटका 

वेबसिरीजच्या नावाखाली सुरू होता देहव्यापार; दोन मॉडेलसह तिघींची सुटका 

छिल्लरच्या मते कोविड-१९ काळात महिलांवरील अत्याचारात वाढ.

मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेने पश्चिम उपनगरातील एका बड्या हॉटलेच्या खोलीत छापा टाकून वेबसीरिजच्या नावाखाली सुरु असलेल्या देहव्यापाऱ्याची पोलखोल केली आहे. याप्रकरणी समाजसेवा शाखेने एका कास्टिंग डायरेक्टर महिलेला अटक केली असून तीन तरुणींची यातून सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या तिघीपैकी दोघी मॉडेल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वेबसिरीजच्या नावाखाली कास्टिंग डायरेक्टर असलेली एक महिला मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी येणाऱ्या तरुणींना गाठत असे व त्यांना वेबसिरीज, हिंदी मालिकेत काम देण्याच्या नावाखाली त्यांना देहव्यापारात लोटत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. समाजसेवा शाखेचे एसीपी संजय पाटील यांनी एक  बोगस ग्राहक तयार करून या महिलेला संपर्क करण्यात आला. वेबसिरीज, कॅलेंडर शूटमध्ये काम करणाऱ्या नवोदित मॉडेल पुरवीत असल्याचे तिने सांगितले.

हे ही वाचा:

तुंबलेल्या मुंबईचा आढावा घ्यायला ५ मिनिटांची ‘फ्लाईंग व्हिजिट’

सेलिब्रिटीजच्या मुंबई प्रेमावर नितेश राणे बरसले

टाटा सन्सच्या बोर्डासाठी नोएल टाटांचे नाव?

ठाकरे सरकारची निष्क्रियता; अस्मिता योजनेचा उडाला बोजवारा

सुमारे ५० हजार रुपयांचे मोबदल्यात मॉडेल देत असल्याची ती म्हणाली. बोगस ग्राहकाने तिची अट मान्य करताच मंगळवारी तिने वर्सोवा येथील हॉटेलमध्ये येण्यास सांगितले.समाजसेवा शाखेच्या पथकाने बोगस ग्राहकासोबत जाऊन त्या हॉटेलमध्ये छापा टाकला. या महिलेने तीन तरुणींना देहव्यापारासाठी या ठिकाणी आणले होते. पोलिसांनी या तिघींची सुटका करतानाच या एजंट महिलेला अटक केली.

ही महिला बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षापासून सक्रिय असून अनेक निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे. ही महिला चित्रपट क्षेत्रात नशीब अजमाविण्यासाठी आलेल्या तरुणांनी देहव्यापार करण्यास भाग पाडते आणि नंतर वेबसिरीज अथवा एखाद्या मालिकेत किरकोळ भूमिका मिळवून देत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या महिलेला पुढील चौकशीसाठी वर्सोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version