30 C
Mumbai
Monday, December 2, 2024
घरक्राईमनामाबेकायदा स्टॉक एक्स्चेंज 'डब्बा ट्रेंडिंग' चा डब्बा गुल

बेकायदा स्टॉक एक्स्चेंज ‘डब्बा ट्रेंडिंग’ चा डब्बा गुल

बेकायदेशीर स्टॉक एक्सचेंजच्या कार्यालयातून ५० हजार रुपये रोख आणि पाच मोबाइल फोनसह लॅपटॉप, टॅब जप्त

Google News Follow

Related

बेकायदेशीर ‘स्टॉक एक्सचेंज’ चालणाऱ्या डब्बा ट्रेंडिंगचा गुन्हे शाखा कक्ष ११ च्या पोलिसांनी डब्बा गुल करत एकाला अटक केली आहे. मागील ४ महिन्यात साडेचार कोटींचा टर्नओव्हर असणाऱ्या या बेकायदेशीर स्टॉक एक्सचेंजने शासनाचा सुमारे दोन कोटी रुपयांचा महसूल बुडवला आहे.

 

गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या पथकाकडून दोन दिवसांपूर्वी कांदिवली पश्चिम महावीर नगर याठिकाणी एका इमारतीत असणाऱ्या कार्यालयावर छापेमारी केली करून सुरेश मेहता (४५) या शेअर्स ब्रोकरला अटक केली. छाप्यादरम्यान, गुन्हे शाखेने बेकायदेशीर स्टॉक एक्सचेंजच्या कार्यालयातून ५० हजार रुपये रोख आणि पाच मोबाइल फोनसह लॅपटॉप, टॅब आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. हे उपकरण बेकायदेशीर शेअर ट्रेडिंगसाठी वापरले जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

हे ही वाचा:

समान नागरी कायदा आणण्यात मुख्य अडथळे कोणते?

होय, मोदींनीच लस तयार केली!

दर्शना पवारची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरेला अटक, हत्येचे कारण स्पष्ट

मोदींसोबत योगसत्राचे नेतृत्व करण्याचा प्रसंग ‘सन्मानक्षण’

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि भारताच्या मल्टी-कमोडिटी एक्सचेंजच्या प्रतिनिधींसह गुन्हे शाखा कक्ष ११च्या चौकशीत मेहता यांच्याकडे शेअर्सचा व्यापार करण्यासाठी कोणताही परवाना किंवा परवानगी नसल्याचे चौकशीत समोर आले. तसेच मेहताला स्टॉक एक्स्चेंज चालवण्याची कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नव्हती आणि ते ‘मूडी’ नावाचे ऍप्लिकेशन वापरून बेकायदेशीर शेअर ट्रेडिंग चालवत होता आणि विविध शासकीय कर बुडवून शासनाची फसवणूक करीत होता. मेहता एक अप्लिकेशन वापरत होता आणि स्पॉट ट्रेडिंग करत होता, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

मेहताच्या लॅपटॉपमध्ये सापडलेल्या ट्रेडिंगची यादी तपासल्या नंतर शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवहार हा रोखीने करण्यात येत होता असे समोर आले. मार्च २०२३ ते २० जून दरम्यान मेहता याने डब्बा ट्रेंडिंग मधून ४,६७२ कोटींचे शेअर ट्रेडिंग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

 

 

तपासादरम्यान पोलिसांना अशी माहिती मिळाली की, मेहता यांनी सुरक्षा व्यवहार कर आणि भांडवली नफा कर, राज्य सरकारचे मुद्रांक शुल्क, सेबी टर्नओव्हर शुल्क, स्टॉक एक्सचेंज ट्रेडिंग महसूल भरण्याचे टाळून शासनाचा सुमारे १.९५ कोटींचा महसूल बुडवला असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राज तिलक यांनी सांगितले.

 

डब्बा ट्रेडिंग म्हणजे नक्की काय ?

बेकायदेशीर स्टॉक एक्सचेंज चालवून त्यामार्फत रोखीने व्यवहार करून शासनाचा कर बुडवून शासनाची फसवणूक करण्यात येते. एखाद्या विशिष्ट स्टॉकच्या जागेची मालकी घेण्यासाठी प्रत्यक्ष व्यवहार न करता स्टॉकच्या किमतीच्या हालचालींवर लक्ष ठेवून बेकायदेशीर सट्टेबाजी करण्यात येते. स्टॉकच्या किमतीच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याच्यावर बेटिंग, जुगार खेळला जातो त्यालाच डब्बा ट्रेंडिंग किंवा बॉक्स ट्रेंडिंग, बकेट ट्रेंडिंग देखील म्हटले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
204,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा