मुंबईतील धारावी येथे बेकायदेशीर कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला गुन्हे शाखा कक्ष ८च्या पथकाने अटक केली असून कुंटणखान्यातून ४ तरुणीची सुटका करण्यात आली आहे. बेकायदेशीर कुंटणखाना प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात पिटा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारावी काळा किल्ला येथील सोशल नगर परिसरात एक महिला बेकायदेशीर कुंटणखाना चालवत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष ८ च्या पथकाला मिळाली होती. कक्ष ८चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरुवारी धारावीतील सोशल नगर येथील एका घरात छापा टाकला असता तेथील एका खोलीत ४ तरुणी आढळल्या.
हे ही वाचा:
बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला पोलीस, परंतु अधिकाऱ्याला मारलेल्या सॅल्यूटने केला घात!
टीएमसी नेत्यांवर महिलांचे गंभीर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेशखाली येथील पीडितांची घेणार भेट!
शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत शेतकऱ्याचा मृत्यू
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणीकडे चौकशी केली असता त्याने त्यांना वेश्यागमनासाठी खोलीत ठेवण्यात आले होते अशी माहिती समोर आली. गुन्हे शाखेने या चार ही तरुणीचा जबाब नोंदवून त्यांची कुंटणखान्यातून सुटका करून कुंटणखाना चालवणाऱ्या ४६ वर्षीय महिलेला अटक करून तिच्याविरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.