रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना धमकीचे मेल पाठवून ४०० कोटींची खंडणी मागणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला तेलंगणा येथून अटक करण्यात आली आहे. गणेश वनपारधी (१९) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
गणेश वनपारधी हा सॉफ्टवेअर इंजिनीयरिंगचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर येत आहे. गावदेवी पोलिसांनी वनपारधी याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ८ नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गणेश वनपारधी याने २७ ऑक्टोबर ते १ ऑक्टोबर या काळात पाच धमकीचे ईमेल मुकेश अंबानी यांना पाठवले होते.
सर्वात प्रथम मेल मध्ये २० कोटींची खंडणी मागण्यात आली होती. “जर तुम्ही (अंबानी) आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज आहेत.” असा धमकीचा मेल पाठविण्यात आला होता.
एकाच ईमेल आयडीवरून शनिवारी संध्याकाळी दुसरा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला, ज्यामध्ये २०० कोटींची मागणी करण्यात आली. आणि त्यात असे लिहिण्यात आले की, “तुम्ही आमच्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही; आता तुम्ही आम्हाला २०० कोटी रुपये द्याल. जर तुम्ही पैसे दिले नाहीत, तर तुमच्या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली जाईल. शुक्रवारी रात्री ९ वाजता मुकेश अंबानी यांच्या कार्यकारी सहाय्यकाने अल्टामाऊंट रोडवरील अँटिलिया इमारतीचे सुरक्षा प्रभारी देवेंद्र मुन्शीराम यांनी शादाब खान नावाच्या व्यक्तीच्या मेल आयडीवरून धमकीचे ईमेलची आल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
हे ही वाचा:
मोदींचे स्केच काढणाऱ्या चिमुकलीला लिहिलं पत्र
विदर्भ, मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांतून ३ लाख रोजगार निर्मिती
अनुसूचित जातीसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची समाधानकारक अंमलबजावणी
गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य
दोन मेल पाठोपाठ सोमवारी खंडणीखोराने अंबानींच्या अधिकृत ईमेल आयडीवर तिसरा ईमेल पाठवून ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्याला मंगळवार आणि बुधवारी असे आणखी दोन ईमेल असे एकूण पाच धमकीचे मेल पाठविण्यात आले होते.