म्हणून त्या प्रियकराने प्रेयसीला खाडीत ढकलले

पोलिसांनी केली प्रियकराला अटक

म्हणून त्या प्रियकराने प्रेयसीला खाडीत ढकलले

लग्नासाठी सतत तगादा लावणाऱ्या २० वर्षीय प्रेयसीला भाईंदर येथे आणून तिला खाडीत लोटून तिची हत्या केल्याची घटना मुंबईतील मलबार हिल येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून प्रियकराला विरार येथून अटक केली आहे.

अभिषेक सरफरे असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव असून अंकिता शिवगण असे हत्या करण्यात आलेल्या प्रेयसी नाव आहे. अंकिता ही मुंबईतील मलबार हिल येथील डेलिसीया या इमारतीत काकांचा मुलासह राहण्यास होती. तर अभिषेक हा विरार पूर्व येथे राहणारा आहे. २०१६ मध्ये अंकिता आणि अभिषेक यांच्यात गावी असताना प्रेमप्रकरण जुळले होते.

त्यानंतर अंकिता ही काकांच्या घरी राहण्यास आली तर अभिषेक हा विरार येथे राहण्यास होता. मागील ६ वर्षांपासून दोघात प्रेमप्रकरण सुरू होते, मात्र अंकिता हिने अभिषेकने आपल्याशी लग्न करावे म्हणून तगादा लावला होता.

हे ही वाचा:

दहशतवादाला चीन घालतोय खतपाणी

आमदार निघून गेले आता नगरसेवकांना साकडे

पुण्यात १३-१४ ऑगस्टला रंगणार मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवल

कर्नाटकात ख्रिश्चन शाळेत मुलांच्या हातावरील राख्या काढून फेकल्या

 

३१ जुलै रोजी अंकिता ही बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या चुलत भावाने मलबार हिल पोलीस ठाण्यात केली होती. अंकिताचा शोध घेण्यात येत असताना पोलिसांनी तिचे कॉल डिटेल्स तपासले असता सर्वाधिक कॉल अभिषेक याचे दिसून आले, पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अंकीताला भाईंदर खाडी येथे आणून तिला पुलावरून खाडीत लोटून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अभिषेक याला अटक केली असून अंकीताच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

Exit mobile version