तलवारीने केक कापणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

तलवारीने केक कापणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

वाढदिवशी केक तलवारीने कापण्याची आजकाल फॅशन निघाली आहे. असे कृत्य करणाऱ्यांना वेळोवेळी पोलिस कठोर शासन करत असतात. असाच प्रकार कांदिवली पश्चिम येथे घडलेला पाहायला मिळाला. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनापरवाना लोकांना जमवून तलवारीने केक कापण्याचा उद्योग दोन तरुणांनी केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यावर पोलिसांनी कारवाई केली.

गुन्हा नोंद 09/2022 कलम 188, 269,270,34 भा द वि सह कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास रघुलीला मॉलच्या समोर, बोरसा पाडा रोड येथील फूटपाथवर, चिकन सेंटर शेजारी, कांदिवली पश्चिम मुंबई या ठिकाणी आरोपी नामे सिलम बरसम सुब्रमण्यम वय २२ वर्षे व कौसर मेजर खान वय २३ वर्षे यांनी सार्वजनिक ठिकाणी वाढदिवसाचा केक कापण्या करता लोकांना एकत्र जमवून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले.

बेकायदेशीरपणे विनापरवाना लोखंडी धारदार पाती असलेल्या तलवारीने केक कापून व्हिडिओ शूटिंग काढून ते समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने व्हायरल केला. मा.मुंबई पोलीस उपआयुक्त अभियान यांच्या हत्यार बंदी आदेशाचे उल्लंघन केले.

हे ही वाचा:

लहान मुलांच्या ममींचे काय आहे रहस्य?

खोक्यात खेकडे असल्याचा बनाव; प्रत्यक्षात निघाली कासवे

‘बुल्ली बाई’ प्रकरणी नेपाळी नागरिकाने दिले मुंबई पोलिसांना आव्हान

मोदी अडथळा बनलेत…

 

यासंदर्भात तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक इंद्रजीत भिसे यांनी हत्यात हस्तगत केले असून ती लोखंडी मूठ असलेली चंद्रकार आकाराची ३१.५ इंच लांबीची तलवार आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सिलम बरसम सुब्रमण्यम (२२ वर्षे),  कौसर मेजर खान (वय २३ वर्षे).

Exit mobile version