२ कोटींचे हशिश ऑइल जप्त, दोन जणांना अटक

आझाद मैदान युनिटला मिळाली होती माहिती

२ कोटींचे हशिश ऑइल जप्त, दोन जणांना अटक

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २ कोटी रुपये किमतीचे ‘हशीश ऑईल’ सह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिट ने वांद्रे परिसरात केली असून याप्रकरणी या दोघा विरुध्द अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आनंद कुमार आणि उदय कुमार देवेंद्रन असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून दोघे उच्च शिक्षित आहे. आनंद कुमार याचे शिक्षण बीएस्सी आयटी पर्यत झालेले असून उदय कुमार हा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर असून तो एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी काम करतो, दोघेही तामिळनाडू मदुराई येथील रहिवासी आहेत.

 

वांद्रे पश्चिम येथे दोन तरुण अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आझाद मैदान युनिटने सापळा रचून या दोघांना संशयावरून ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता एकाकडे दोन किलो वजनाचे हशीश ऑइल आढळून आले. अमली पदार्थ विरोधी पथकाने हे ऑईल जप्त करून दोघांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघाना अटक करण्यात आली आहे.

पोलिसानी जप्त केलेल्या हशीश ऑईल ची किंमत २ कोटी रुपये असून या ऑईल चा वापर नशेसाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या दोघांनी हे ऑइल कुठून मिळवले व ते कोणाला देणार होते याबाबत तपास सुरू असल्याचे पोलोसांनी दिली आहे.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींनी खासदारांना सांगितलं, मोदीजी नका म्हणू मोदी म्हणा

नो वन किल्ड दिशा…

केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

१०० कोटी रुपयांच्या विदेशी निधीप्रकरणात ८० मदरसे रडारवर

हशिश ऑईल कसापासून तयार होते….

हशिश ऑईल हा अंमली पदार्थ गांजा या वनस्पतींच्या भागांपासून किंवा भांग,चरसच्या अर्कातून तयार केला जातो. हशिश ऑईल हे द्रव ,स्थायू स्वरूपात मिळत असून, त्याचा रंग सामान्यतः पारदर्शक सोनेरी किंवा हलका तपकिरी रंग किंवा टॅन किंवा काळसर असून, त्याचा वापर सेवनासाठी, धुम्रपानासाठी केला जातो. धुम्रपानासाठी हशिश ऑईल डबिंग उपकरण, विशेष प्रकारचा वॉटर पाईप्स, व्हेपोरायझर्स आणि व्हेप पेन मधून केला जातो.

Exit mobile version