28 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामाटोइंग करताना पोलिसालाच पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवले; मग सापडले जाळ्यात

टोइंग करताना पोलिसालाच पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवले; मग सापडले जाळ्यात

दोन जणांना केली अटक, पुढील तपास पोलिस करत आहेत

Google News Follow

Related

मुंबईत तसेच मुंबईतून बाहेर जाताना टोल मध्ये तसेच इतर सवलत मिळविण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे बनावट ओळख पत्र वापरणाऱ्या दोघांना शिवडी येथून अटक करण्यात आली आहे. या दोघाजवळ एकाच नावाचे दोन ओळखपत्रे सापडली आहेत.

पोलिसांनी पकडल्यावर तसेच पार्किंगमध्ये सवलत मिळविण्यासाठी ओळखपत्राचा वापर करीत असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या दोघांनी दिली असली तरी हे दोघे पोलिसांच्या नावाने लोकांना धमकावून खंडणी उकळत असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

अब्दुल हमीद शेख (५३) आणि सनी इस्माईल भावेकर (४९)असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे अँटॉप हिल परिसरात राहणारे आहेत. भोईवाडा वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई प्रवीण महाले हे वडाळा येथे रस्त्यावर पार्क करण्यात आलेली वाहने टोईंग करीत असताना अब्दुल शेख हा त्या ठिकाणी आला व त्याने पोलीस शिपाइ महाले यांना तुम्ही विनाकारण वाहने टोईंग का करीत आहे असे बोलून त्याच्याशी वाद घालू लागला व तो स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे सांगून लांबूनच महाले यांना खिशातून ओळखपत्र काढून दाखवले. परंतु महाले यांना त्याच्यावर संशय आल्यामुळे त्यांनी त्याला ओळखपत्र पुन्हा दाखविण्यासाठी सांगितले असता त्याच्यावर ओळखपत्रावर सनी भावेकर नाव लिहिले होते तसेच फोटो देखील दुसरा होता. पोलीस उपनिरीक्षक असे पद ओळखपत्रावर लिहिण्यात आले होते. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता माझा भाऊ पोलीस असून त्याचे हे कार्ड असल्याचे त्याने सांगितले.

हे ही वाचा:

पत्रकारांना आता एसटीमधून जावे लागणार ‘उडत उडत’

मंत्रालयासमोर करण्यात आलेल्या विषप्राशनाचे वास्तव आले समोर

सावरकरवादी नाही, तेव्हा ठाकरे अजमेरावादी होते!

बिग बँग थिअरीमध्ये माधुरी दीक्षितबद्दल आक्षेपार्ह भाषा, रागावलेल्या चाहत्याने उचलले हे पाऊल

मात्र पोलिसांच्या ओळखपत्रावर पाच डिजिट क्रमांक असतात मात्र या व्यक्तीकडे असलेल्या ओळखपत्रावर ६ डिजिट क्रमांक असल्यामुळे पोलीस शिपाई महाले यांना ओळखपत्र बनावट असल्याचा संशय आला व ते त्याला घेऊन रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात आले. रफी किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता सनी भावेकर नावाच्या मित्राने त्याला हे ओळखपत्र दिले असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी सनी भावेकर याला अँटॉप हिल पोलीस ठाण्यातून ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता आम्ही हे ओळखपत्र बनवून केवळ टोल वाचवणे, गाडी पार्क करणे यासाठी वापरत होतो अशी माहिती दोघांनी दिली. परंतु हे दोघे बनावट ओळखपत्राच्या आधारे लोकांना लुटत असावे तसेच मुंबईतील बेकायदेशीर व्यवसायांच्या ठिकाणी जाऊननखंडणी वसुल करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या अनुषंगाने तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांना मंगळवारी शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना १ एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा