१२ वर्षाच्या मुलीला लोटले देहव्यापारात

हॉटेल व्यवस्थापकासह दोन जणांना अटक

१२ वर्षाच्या मुलीला लोटले देहव्यापारात

१२ वर्षांच्या मुलीला बळजबरीने देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या दोघांच्या तावडीतून पोलिसांनी १२ वर्षाच्या मुलीची सुटका केली आहे. ही कारवाई अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे.

एक महिला अंधेरी पूर्व येथील एका हॉटेल मॅनेजरच्या मदतीने १२ वर्षाच्या मुलीकडून बळजबरीने देहविक्री करून घेत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १०चे प्रपोनि. दीपक सावंत यांना मिळाली होती. कक्ष १०च्या पथकाने आपल्या खबऱ्यामार्फत अधिक माहिती मिळवली असता अंधेरी पूर्व मरोळ येथील ‘सिल्वर क्लाउड’ हॉटेलचा व्यवस्थापक या देहविक्रीत गुंतला असून हॉटेलवर येणाऱ्या ग्राहकांना तो मुली पुरवत असल्याची माहिती समोर आली.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींनी खासदारांना सांगितलं, मोदीजी नका म्हणू मोदी म्हणा

१०० कोटी रुपयांच्या विदेशी निधीप्रकरणात ८० मदरसे रडारवर

राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत आराखडा सादर करा

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तब्बल ७ हजार जणांना आमंत्रण!

कक्ष १० च्या पथकाने बोगस ग्राहक तयार करून हॉटेल सिल्वर क्लाउड या ठिकाणी पाठवून हॉटेल व्यवस्थापकाकडे मुलीची मागणी केली. सौदा ठरताच कक्ष १०च्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा रचून ‘सिल्वर क्लावुड हॉटेल या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी १२ वर्षे वयोगटातील एक मुलगी आणि एक महिला मिळून आली. गुन्हे शाखने महिलेला ताब्यात घेऊन तिच्याजवळून ७ हजार रुपये रोख आणि २ मोबाईल जप्त करून मुलीची या महिलेच्या तावडीतून सुटका करण्यात आली.

गुन्हे शाखेने या देहविक्रीच्या व्यापाऱ्यात गुंतलेल्या सिल्वर क्लाउड हॉटेलच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. या दोघा विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version