रत्नागिरी पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकाजवळ या गांजाची विक्री होत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. २५ हजार ४२५ रुपये किंमतीचा एक किलो गांजाची विक्री होत होती. निरंकार राजेंद्र शिंदे ऊर्फ नदीम समीर जसनाईक आणि तौसिफ इक्बाल चौगुले या दोघांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
खेड रेल्वे स्थानक परिसरात गांजा विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. निरंकार राजेंद्र शिंदे ऊर्फ नदीम समीर जसनाईक (२१) आणि तौसिफ इक्बाल चौगुले (२१) हे दुचाकीवरून खेड रेल्वे स्थानकात पोहचले.
हे ही वाचा:
राज्यात ओमिक्रोन रुग्णांची संख्या शंभरी पार
पंतप्रधान मोदींनी मुलांसाठी केली ही घोषणा
खरोखरच नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, कृषि कायदे परत आणण्याबद्दल?
सनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे वादात
त्यानंतर रात्री ८.२० वाजता पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक किलो गांजा सापडला. पोलिसांनी दुचाकीसह सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि २ हजार ८४० रुपये रोकड असा एकूण १ लाख ८ हजार ६२५ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गांजा विक्री केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक पोलीस करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन लाख रुपये किंमतीचा साडेसहा किलो गांजा जप्त केला होता. त्यापूर्वी भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल १६ लाख ३७ हजार ४८० रुपये किंमतीचा ७५ किलो गांजा जप्त केला होता.