लसूण चोरी करीत असल्याच्या संशयातून एका हमालाची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार बोरिवली पश्चिम येथे गुरुवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसानी लसूण व्यापाऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पंकज मंडल असे हत्या करण्यात आलेल्या हमालाचे नाव आहे. पंकज हा बोरीवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळ असणाऱ्या भाजी मार्केट या ठिकाणी मागील ४ वर्षापासून हमालीचे काम करीत होता. मंडल हा मूळचा झारखंड राज्यातील राहणारा आहे. या मार्केटमध्ये घनश्याम खाक्रोडिया हा लसूण विक्रेता व्यवसाय करतो. मागील काही महिन्यांपासून घनश्याम याच्या गाळ्यातून लसूण ची चोरी होत होती, घनश्याम याला पंकज याच्यावर चोरीचा संशय होता.
हे ही वाचा:
दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या पुलवामामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना!
महिला न्यायाधीशाची मुख्य न्यायाधीश चंद्रचूडांकडे इच्छामरणाची मागणी!
धोनीच्या ७ क्रमांकाच्या जर्सीने ‘पाठ’ सोडली!
OLX वर जुना बेड विकायला गेला अन ६८ लाखांचा बसला फटका!
बुधवारी रात्री घनश्यामने चोरीच्या संशयावरून पंकजला जाब विचारत त्याला मारहाण केली. या मारहाणीत घनश्यामने पंकजच्या गुप्तांगावर गुडघ्याने प्रहार करताच पंकज हा जमिनीवर कोसळला, त्यानंतर ही घनश्याम हा पंकजला लाथेने मारहाण करीत होती.
काही हमालांनी घनश्यामच्या तावडीतून पंकजची सुटका करून त्याला एका गाळ्यात झोपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पंकजचा मित्र आर्षद शेख हा त्याला उठविण्यासाठी गेला असता तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता व त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होता. अर्षदने तात्काळ पोलिसांना फोन करून याबाबत सूचना दिली. बोरिवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंकजला पोलीस व्हॅनमधून शताब्दी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून व्यापारी घनश्याम खाक्रोडिया याला अटक करण्यात आली आहे.