विक्री करण्यासाठी ३ वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना वडाळा परिसरात घडली होती. वडाळा पोलिसांनी १२ तासात अपहरणकर्त्याचा शोध घेऊन एका कॉलेज विद्यार्थीनीसह तीन जणांना अटक केली आहे. मुलाची विक्री करीत असताना व्यवहार फिस्कटल्यामुळे पुढचा अनर्थ टळला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पवन पोखरकर उर्फ पव्या (२०) सार्थक बोंबले आणि सानिका वाघमारे (१८) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. वडाळा परिसरात राहणारे सुमन चौरसिया (२७) यांचा ३ वर्षांचा मुलगा २० नोव्हेंबर रोजी दुपारी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. याप्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वडाळा पोलिसांकडून मुलाचा शोध घेण्यात येत असताना सायंकाळी दोन इसम मुलाला अपहरण झालेल्या ३ वर्षांच्या मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात आले व त्यांच्या ओळखीची सानिका वाघमारे हिला हा मुलगा बेवारस मिळून आला. तिने मुलाला पोलीस ठाण्यात देण्यात सांगितले असे मुलाला घेऊन आलेल्या दोघांनी पोलिसांना सांगितले. मुलाला घेऊन आलेले दोघे खरे बोलत आहे का हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी सानिका वाघमारेला कॉल करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
सानिका पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिच्याकडे चौकशी केली असता चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
हे ही वाचा:
राम मंदिरातील पुजारी पदासाठी आले तब्बल ३ हजार अर्ज!
उत्तरकाशीत अडकलेल्या कामगारांच्या पोटाला आधार मिळाला, पाइपलाइनमधून अन्नपुरवठा
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करा; अन्यथा १ कोटी रुपयांचा दंड आकारू!
भारत-ऑस्ट्रेलिया करणार चीनच्या आव्हानांचा एकजुटीने सामना
सानिका ही घाटकोपर येथील एका कॉलेजात बीएस्सीचे शिक्षण घेत आहे. तिचा मित्र पवन पोखरकर याने दहा वर्षांच्या आतील मुलाला घेऊन ये तुला दोन लाख रुपये देतो असे सांगितले होते. सानिका वाघमारे हिने घराजवळ खेळणाऱ्या ३ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले व त्याला घेऊन दोघे वडाळा येथून टॅक्सीने गेले. कल्याण फाटा या ठिकाणी मुलाची विक्री करण्यात येणार होती. राजेंद्र बोंबले हा त्या ठिकाणी भेटला त्यांच्यात विक्रीचा व्यवहार फिस्कटला आणि सानिका ही मुलाची विक्री न करता त्याला घेऊन वडाळा येथे आली व त्याठिकाणी तिला तिच्या घराशेजारी राहणारे दोघेजण दिसले व त्यांना तिने मुलगा सापडून आला त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जा, असे सांगून ती निघून गेली होती.
सानिकाच्या चौकशीत समोर आलेल्या तपासा नंतर पोलिसानी पवन आणि सार्थक या दोघांचा शोध घेवून या अपहरणाच्या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली.