27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामाबेवारस मृतदेहाला खोटी ओळख देऊन त्यांनी रचले मोठे कारस्थान

बेवारस मृतदेहाला खोटी ओळख देऊन त्यांनी रचले मोठे कारस्थान

पोलिसांनी कारस्थान उघडकीस आणले आणि तिघांना केली अटक

Google News Follow

Related

शवगृहातील बेवारस मृतदेहाला खोटी ओळख देऊन मोठे कारस्थान रचणाऱ्या एका टोळीचे पितळ शिवाजी पार्क पोलिसांनी उघडे पाडले आहे. या टोळीतील मुख्य सुत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

भारतीय आयुर्विमा कंपनीकडून दोन कोटी रुपयांचा क्लेम करण्याच्या या कटात रुग्णालयातील कर्मचारी तसेच विमा कंपनीतील काही कर्मचारी यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात असून या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिनेश टाकसाळे, अनिल लटके आणि विजय माळवदे असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून हे तिघे मूळचे अहमदनगर जिल्ह्यात राहणारे आहेत. या टोळीत एका महिलेचा समावेश असून तिने मृत पॉलिसी धारकाच्या आईची भूमिका निभावली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार अनिल लटके आहे. दिनेश टाकसाळे, लटके आणि माळवदे हे तिघे जवळचे मित्र आहेत. दिनेश हा वाहन मॅकेनिक असून लटके आणि माळवदे सिव्हिल डिप्लोमा होल्डर असून, तिघेही विवाहित आहेत.

झटपट श्रीमंत होण्यासाठी या तिघांनी २०१५ मध्ये एक भयंकर कट रचला होता. या तिघांनी दिनेश टाकसाळे याला नगर जिल्ह्यातील जमीनदार दाखवून भारतीय आर्युविमा कंपनीच्या (एलआयसी) दादर शिवाजी पार्क शाखेत दिनेश टाकसाळे याचा २ कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. वर्षभर विम्याचे नित्याने हप्ते भरल्यानंतर २०१६ मध्ये दिनेश टाकसाळे याच्या आईची भूमिका करणाऱ्या ५१ वर्षीय महिलेने शिवाजी पार्क येथील एलआयसी कार्यालयात जाऊन दिनेश टाकसाळे याचा वाहन अपघातात मृत्यू झाला असल्याचे कागदपत्रे सादर करून विमा कंपनीकडे विम्याची रक्कम मिळविण्यासाठी दावा केला होता.

मात्र विमा कंपनीला आलेल्या संशयावरून कंपनीने या प्रकरणाचा तपास करून दिनेश टाकसाळे जिवंत असल्याचे त्याच्या तपासात समोर आले होते. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात एलआयसीने तक्रार दाखल केली होती.
शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता, पोलिसांच्या तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली. आरोपी दिनेश टाकसाळे, अनिल लटके आणि विजय माळवदे या तिघांनी २०१५मध्ये हा कट रचला होता. या कटात त्यांनी दिनेश टाकसाळे याच्या नावावर पॉलिसी काढून वर्षभराने दिनेश टाकसाळे याला मृत दाखवून पॉलिसीच्या पैशासाठी दावा करण्याचे ठरले होते. २०१६ मध्ये नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा महामार्गावर अपघातात मृत झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, या मृतदेहाची ओळख पटलेली नसल्यामुळे बेलवंडी पोलिसानी मोटरवाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून मृतदेह श्रीगोंदा येथील सरकारी शवगृहात ठेवण्यात आला होता.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे पंतप्रधान काय होणार? शिवसेना आता संपली, काही राहिलेलं नाही

महिला दिनाच्या निमित्ताने अनोखा माहेरवाशिणी महिला दिवस

पुण्याच्या पैलवानाचा कुस्तीच्या तालमीत सरावा दरम्यान मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत माणिक साहा यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

 

टाकसाळे, लटके आणि माळवदे हे तिघे अपघातात मृत झालेली बेवारस मृतदेह शोधत असताना त्यांना सरकारी शवगृहात असलेल्या बेवारस मृतदेहाची माहिती मिळाली. या तिघांनी शवगृहात असलेला मृतदेह बघून बेलवंडी पोलीस ठाण्यात मृत व्यक्ती दिनेश टाकसाळे असल्याचे सांगितले व त्या ठिकाणी दिनेश टाकसाळे याची आई म्हणून भलत्याच महिलेला पोलीस ठाण्यात हजर करून मृतदेह ताब्यात घेतला.

मृतदेहावर या तिघांनी अत्यंसंस्कार करून दिनेश टाकसाळे यांच्या नावाने कागदपत्रे तयार करून हे कागदपत्रे शिवाजी पार्क येथील एलआयसी कार्यालयात जमा करून विम्यासाठी दावा करण्यात आला होता, अशी माहिती परिमंडळ ५चे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून आईची भूमिका निभावणाऱ्या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. तसेच या सर्व कटात आणखी काही जण सामील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा