नक्षलवाद्यांचे चिन्ह वापरून खंडणी मागणाऱ्यांना बेड्या

नक्षलवाद्यांचे चिन्ह वापरून खंडणी मागणाऱ्यांना बेड्या

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका एमबीबीएस असलेल्या डॉक्टरला आलेल्या धमकीच्या पत्राचा खुलासा झाला आहे. ‘लाल सलाम’ या नक्षलवादी संघटनेचा चिन्ह वापरून तयार करण्यात आलेल्या पत्रात डॉक्टरकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी मागणारे नक्षलवादी नसून एक बारगर्ल आणि तिचे दोन साथीदार निघाल्यामुळे डॉक्टर आणि पोलिसानी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या बारगर्ल सह तिघांना अटक केली आहे.

पैशांची खूप गरज असल्यामुळे या तिघांनी हा मार्ग निवडला होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. भायशाकी बिश्वास, मोहम्मद हयात शहा आणि विक्रांत किरत असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. भायसकी ही नवी मुंबई घणसोली येथे राहणारी असून दहिसर चेकनाका याठिकाणी एका बार मध्ये बारगर्ल म्हणून काम करते. मोहम्मद हयात हा मालाड पूर्व स्कॉटर कॉलनी येथे राहणारा असून विक्रांत हा विरार पूर्व येथे राहणारा आहे.

गोरेगाव पूर्व पांडुरंग वाडी येथील श्री क्लिनिकचे ७० वर्षीय डॉक्टर वाडीलाल शहा यांच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या मुलाकडे १५ तारखेला बुरख्यात आलेल्या महिलेने एक बंद लिफाफा देऊन डॉक्टरांना देण्यास सांगून घाईघाईने तेथून निघून गेली होती. डॉक्टर शहा यांनी घरी जाऊन लिफाफा उघडला असता त्यात लाल सलाम या नक्षलवाद्याच्या लेटरहेड वर धमकीचा संदेश लिहण्यात आला होता, त्यात ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, पैसे दिले नाही तर ऑपरेशन स्टार्ट अंतर्गत मुलाची त्यानंतर ऑपरेशन एंड मध्ये तुमची हत्या करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती. नक्षलवाद्यांचे धमकीचे पत्र बघून घाबरलेल्या डॉक्टरांनी वनराई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.

हे ही वाचा:

सप्टेंबर अखेरपर्यंत असेल पावसाचा डेरा

चीनला इशारा देणारा ‘ऑकस’ सैन्य करार आहे तरी काय?

‘उद्धवजी, अनैसर्गिक आघाडी केल्याचे आता लक्षात येत असेल ना?’

निरोप देतो तुला गणराया..

गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता मुंबई गुन्हे शाखा कक्ष १२चे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांनी ताबडतोब दोन पथके तयार करून लिफाफा देऊन गेलेल्या महिलेचा शोध सुरू केला. डॉक्टरांच्या क्लिनिक पासून काही किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले असता एका सीसीटीव्हीत या महिलेचा बुरख्या वर केल्यामुळे चेहरा दिसून आला.

पोलिसानी यया महिलेचा शोध घेऊन ३६ तासाच्या आत या महिलेला घणसोली येथून अटक करण्यात आली असता तीने गुन्ह्याची कबुली देत इतर दोन सहकाऱ्याची नावे सांगितले. पोलिसानी तिच्या दोन सहकाऱ्यांचा मुसक्या आवळल्या.
डॉक्टर शहा हे मोहमद ह्यात यांचे फॅमिली डॉक्टर आहेत. मोहम्मद ह्यात याला पैशांची नितांत गरज होती, त्यासाठी त्याने विक्रांत आणि त्याची मैत्रीण भायसाकी ह्या बारगर्ल हिची मदत घेऊन त्यांना पैशांची लालच देऊन खंडणीची योजना आखून युट्युब आणि इतर सोशल मीडियाच्या मदतीने नक्षलवादाच्या नावाखाली खंडणी उकळण्यचा कट रचला. यासाठी त्यांनी सोशल मीडियावरून नक्षलवादी संघटनेचे लेटरहेड काढून त्याचा वापर खंडणीसाठी केला होता अशी माहिती कक्ष १२चे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांनी दिली. या तिघांना अटक करून त्याचा ताबा वनराई पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला असल्याचे तावडे यांनी सांगितले.

Exit mobile version