स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील तायक्वांदो प्रशिक्षकांवर स्मारकाच्या बाहेर हल्ला करणाऱ्या तीन हल्लेखोरांना शिवाजी पार्क पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली आहे. हा हल्ला क्षुल्लक वादातून बुधवारी रात्री दादर शिवाजी पार्क येथे असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या बाहेर करण्यात आला.
मनजोत सिंग तेजदंर सिंग (२७), इमरान नूर मोहम्मद शेख (२८) आणि मनीष राजेश विग (२४) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे सायन कोळीवाडा येथे राहणारे आहेत. बुधवारी रात्री हे तिघे शिवाजी पार्क येथून वनिता समाज हॉलच्या फुटपाथ वरून माहीमच्या दिशेने चालत निघाले होते, त्याच वेळी सावरकर स्मारकात तायक्वांदोचे प्रशिक्षण घेणारे दोन विद्यार्थी सावरकर स्मारकाच्या आऊट गेट मधून बाहेर पडून प्रभादेवीच्या दिशेने चालत निघाले होते.
दरम्यान या हल्लेखोरापैकी एकाने दोन्ही विद्यार्थ्यांची वाट अडवून त्यांच्यासोबत असभ्य वर्तन आणि शिवीगाळ करू लागले होते. या दरम्यान एका विद्यार्थ्यांने तायक्वांदो प्रशिक्षक राजेश खिलारे (५६) यांना फोन केला, प्रशिक्षक खिलारे हे तात्काळ स्मारकाच्या गेट जवळ आले व त्यांनी या तिघांना जाब विचारला असता या तिघांनी खिलारे यांच्या सोबत देखील अश्लील भाषेचा वापर करू लागले. दरम्यान, तिघांपैकी एकाने त्याच्याकडे असलेल्या चाकू सारख्या हत्याराने खिलारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
फडणवीस-शिंदेना अडकवण्याचा डाव, SIT स्थापन!
शिवसेना नेते धोडी यांचा मृतदेह गाडीच्या डिकीत सापडला
पूजा दानोळेच्या रूपेरी यशाने महाराष्ट्राला महिलांना विजेतेपद!
ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवले
खिलारे यांनी हा हल्ला परतून लावला आणि काही कळण्याच्या आत दुसऱ्या आरोपीने खिलारे यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार करून तेथून तिघे हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेले खिलारे यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेत तीन हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा कसून शोध सुरू केला.
शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सरनौबत, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवून सायन कोळीवाडा येथून २४ तासात तिन्ही हल्लेखोरांना बुधवारी पहाटे अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरापैकी एक जण हॉटेल मध्ये स्वयंपाकीचे काम करतो, दुसरा वादक आहे आणि तिसरा आरोपी फिटनेस ट्रेनर असल्याचे समजते. तिघांना अटक करून शुक्रवारी दुपारच्या सत्रात भाईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांना सोमवारपर्यत पोलीस कोठडी सुनावली.