26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामापोलिसांनी उद्ध्वस्त केले सेक्स रॅकेट, शेजारच्या मुलींनाच गुंतवले

पोलिसांनी उद्ध्वस्त केले सेक्स रॅकेट, शेजारच्या मुलींनाच गुंतवले

 अल्पवयीन मुलींची सेक्स रॅकेटमधून सुटका  

Google News Follow

Related

गुन्हे शाखा युनिट 5 ने सेक्स रॅकेटच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुलांची सुटका केली असून तीन आरोपींना अटक केली आहे.

आरोपीने आधी शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलींना पैशाचे आमिष दाखवले आणि नंतर त्यांच्यासोबत सेक्स रॅकेट चालवले. या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी  गोवंडीला राहणाऱ्या २९ वर्षीय महिला, वासिंद येथे राहणारी २३ वर्षीय महिला आणि वासिंदमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय पुरुषाला गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने अटक केली असल्याची माहिती कक्ष ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

दिसली रायगडची पॉवर; अमृता भगत ठरली ‘बेस्ट लिफ्टर’

मुस्लीमांना हव्या विधानसभेच्या ३२ जागा; ठाकरे-पवार मनावर घ्या…

उज्जैनमध्ये निवृत्त सैनिकाचा भाजप नेत्यावर गोळीबार !

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद
गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी नातेवाईक आहेत. तिघेही मिळून हा व्यवसाय चालवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून त्यांना सेक्स रॅकेटमध्ये सहभागी करून घेत असे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी सुटका केलेल्या अल्पवयीन दोघी मुली आरोपींच्या शेजारी राहत होते. एक मुलगी घाटकोपरमध्ये राहते तर दुसरी आसनगाव येथे राहते. आसनगाव येथे राहणाऱ्या महिलेने तिच्या घरी कामासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीला सेक्स रॅकेटमध्ये गुंतवले.

कक्ष ५ च्या पोलिसांनी सांगितले की, महिला अल्पवयीन व्यक्तीकडून १५ ते २० हजार रुपये घेत असत. मात्र, त्यापैकी केवळ तीन हजार रुपये तिने अल्पवयीन मुलीला दिले जात. कुर्ला पोलीसांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलींना देहविक्रीकरीता पुरविणा-या टोळीतील तीन आरोपीना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने अटक करून दोन अल्पवयीन मुलींची सुटका केला आहे.

अल्पवयीन मुलींना देहविक्रीकरीता पुरविणारी टोळी मुंबई परिसरात कार्यरत असून या टोळीतील काही सदस्य हे कुर्ला येथे अल्पवयीन मुलींना देहविक्रीकरीता घेवून येणार असल्याबाबत गुन्हे शाखा, कक्ष ५ यांना माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या अनुषंगाने सापळा रचण्याकरीता कक्ष ५ तर्फे पथक तयार करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने काल कुर्ला रेल्वे स्टेशन बाहेर, कुर्ला पश्चिम या ठिकाणी सापळा रचुन कक्ष ५ कडील पथकाने दोन अल्पवयीन मुलींना फुस लावुन देहविक्रीकरीता आणणा-या २ महीला व १ पुरुष असे ३ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे आणि  त्यांच्या  ताब्यातील  अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा