23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामापोलिसांनी ओळखले सोनसाखळी चोराचे 'रंग'

पोलिसांनी ओळखले सोनसाखळी चोराचे ‘रंग’

सफाई कर्मचारी महिलेच्या गळ्यातून चोरली होती चेन

Google News Follow

Related

एकाच कार्यालयात काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्याची सोनसाखळी चोरी करून ओळख लपविण्यासाठी त्याने चक्क चार वेळा कपडे बदलून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र एका चुकीमुळे त्याची चोरी पकडली गेली आणि तो पोलिसांच्या हाती लागला. माटुंगा येथील मनपा रुग्णालयात काम करणाऱ्या सफाई कर्मचारी महिलेची सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाला माटुंगा पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली आहे.

 

माटुंगा पूर्व रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या महानगर पालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिला सफाई कर्मचारी या १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास साफसफाईसाठी रुग्णालयाचे दार उघडत असतांना चेहऱ्याला रुमाल व मास्क बांधलेला तरुणाने महिला सफाई कर्मचारीच्या गळ्यातील २ तोळ्यांची सोनसाखळी चोरी करून दुसऱ्या रुग्णालय असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मार्गाने पोबारा केला होता.

 

या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनपा रुग्णालय असलेल्या इमारतीत घुसून करण्यात आलेल्या सोनसाखळी चोरीमुळे पोलीस देखील चक्रावले होते. या चोराचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाला सूचना दिल्या. पो.उप.निरी.विनोद पाटील ,स.पोउनी. कांगणे, अंमलदार चव्हाण, पाटील, तांबे, गजभारे,उंडे, नीहारे या पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास चोराचा शोध घेतला असता सोनसाखळी चोराने चोरी केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून जागोजागी कपडे बदलत असल्याचे आढळून आले.

 

सोनसाखळी चोरी केल्यानंतर आरोपीने माटुंगा रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली, त्यानंतर त्याने चिंचपोकळी येथील सुलभ शौचालयात जाऊन कपडे बदलून बाहेर पडला, मात्र कपडे बदलल्यामुळे पोलिसांनी त्याला ओळखले नाही. पुन्हा पुन्हा सीसीटीव्ही तपासले असता शौचालयात गेलेला इसम हा पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि क्रिम रंगांची पॅन्ट घालून त्याने चेहऱ्याचा रुमाल देखील बदलून तो पुन्हा माटुंगा येथे आल्याचे दिसून आला. तो व्यक्ती ज्या ठिकाणी चोरी झाली त्याच इमारतीत जाताना दिसून आला.

हे ही वाचा:

शरद पवारांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं?

कंगना रनौत अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला

क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सांगितली, धर्मांतर, मैदानावर नमाज, पाकिस्तानमधील हिदूंची दुरवस्था

हमासच्या चुकीचा फटका गाझातील पत्रकाराला बसला; इस्रायलच्या बॉम्बवर्षावात कुटुंब मृत्युमुखी

 

त्या इमारतीत असणाऱ्या सार्वजनिक शौचालयात गेला व लाल रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घालून बाहेर पडताना दिसून आला. चिंचपोकळी येथील शौचालयातून बाहेर पडलेली व्यक्तीच माटुंगा येथील शौचालयातून कपडे बदलून बाहेर पडत असल्याचे आले,परंतु त्याने शेवटपर्यत चेहऱ्यावरील रुमाल काढला नसल्यामुळे पोलिस पथकाला संशय आला. पोलिसांनी पुन्हा पुन्हा सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून वर्णनावरून पोलिसांनी माटुंगा मनपा रुग्णालय परिसरात आलेल्या इमारतीत तसेच त्या तक्रारदार महिलेला सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता सदर व्यक्ती हा मनपाचा कंत्राटी कर्मचारी असल्याचा संशय व्यक्त केला.

 

 

पोलिसानी संशयित कंत्राटी कर्मचारी आबासाहेब कमलाकर बाड (२८) याच्या मोबाईलचे घटनेच्या दिवसाचे टॉवर लोकेशन तपासले असता आबासाहेब बाड याचे लोकेशन सापडले. सोनसाखळी चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आबासाहेब असल्याची खात्री होताच त्याचा शोध घेतला असता तोमागील चार दिवसांपासून तो सुट्टीवर गेल्याचे समजले. दरम्यान पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन तपासले असता तो सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील विठ्ठलपूर गावात असल्याचे आढळून आले. पोउपनिरी. विनोद पाटील आणि पथकाने सांगली गाठून त्याला याप्रकरणात अटक करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा