पुजारीचा शार्पशूटर विजय तांबटला मुंबई विमानतळावर अटक

दुबईतून मुंबईला आल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई

पुजारीचा शार्पशूटर विजय तांबटला मुंबई विमानतळावर अटक

कुख्यात गँगस्टर रवी पुजारी टोळीचा शार्पशूटर विजय साळवी उर्फ विजय तांबट याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ठाण्यातील बिल्डर कडे १ कोटीची खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुरुवारी विजय पुरुषोत्तम साळवी उर्फ ​​विजय तांबट याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानी दिली.

 

विजय तांबट हा भारतातून दुबई येथे पळून गेला होता, साळवी उर्फ तांबट विरुद्ध कलम ३८५ (खंडणी) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदी आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलिसांनी त्याच्यासाठी लुकआउट परिपत्रक जारी केले होते, असे ते म्हणाले. विजय तांबट हा दुबई येथून गुरुवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबट उर्फ साळवी हा २०१७ च्या खंडणीच्या एका गुन्ह्यात ठाणे पोलिसांना हवा होता. २०१७ मध्ये ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक रोमा डेव्हलपर्सचे महेंद्र पमनानी यांच्याकडून कुख्यात गँगस्टर रवी पुजारीने १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कॉल केला होता.

हे ही वाचा:

कुत्ता गोळीची नशा कोण करतं ते ठाऊक आहे संजय राऊत!

उद्योग उभारणीसाठी ‘युएसआयबीसी’शी सहकार्य अधिक दृढ करणार

सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात वाढवण बंदरामुळे मोठे बदल होतील

कुत्ता गोळीची नशा कोण करतं ते ठाऊक आहे संजय राऊत!

पुजारीने पमनानी यांना ठार मारण्याची धमकी दिली होती आणि ठाण्यातील बिल्डरच्या कार्यालयात त्याला ठार करण्यासाठी शार्पशूटर पाठवले होते,असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान ठाणे पोलिसांनी याप्रकरणात काही आरोपीना शस्त्रासह अटक केली होती, या गुन्ह्यात विजय तांबट हा फरार होता असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणात अटक आरोपीसह विजय तांबट याच्या विरुद्ध मकोका लावण्यात आला होता.

 

तांबट उर्फ साळवी याच्यावर मुंबईतील कस्तुरबा मार्ग, समता नगर आणि कासारवडवली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्ह्यांची नोंद आहे.

Exit mobile version