31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामागोळीबार करत हॉटेल व्यवसायिकाला पळवले, सात जण अटकेत

गोळीबार करत हॉटेल व्यवसायिकाला पळवले, सात जण अटकेत

खंडणी मागितली पण पोलिसांनी शिताफीने केली अटक

Google News Follow

Related

पिस्तुलाचा धाक दाखवून हवेत गोळीबार करत हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण करून ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार मुंबईतील अंधेरी पूर्व येथे उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी २४ तासात या गुन्ह्याची उकल करत हॉटेल व्यवसायिकाची सुखरूप सुटका करून ७ अपहरणकर्त्यांना मुसक्या आवळल्या आहे.

अटक करण्यात आलेल्या ७ जणांपैकी दोघेजण हॉटेल व्यवसायिकाच्या ओळखीचे असून त्यांच्यात पैशावरून वाद होता त्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनुप शेट्टी असे अपहरण करण्यात आलेल्या हॉटेल व्यवसायिकांचे नाव आहे.

अनुप शेट्टी यांचे अंधेरी पूर्व कुर्ला अंधेरी रोड चकाला या ठिकाणी हॉटेल विरा रेसिडेन्सी नावाचे हॉटेल आहे. वर्षभरापूर्वी अनुप शेट्टी यांनी हे हॉटेल विजय अवकिरकर याला चालविण्यासाठी दिले होते. ६ महिन्यानी अवकिरकर याने हे हॉटेल पुन्हा अनुप शेट्टी यांना परत केले होते, त्यानंतर हे हॉटेल अनुप शेट्टी हे चालवत होते. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसम हॉटेलच्या रिसेप्शन येथे आले व त्यांनी अनुप शेट्टी कुठे आहे असे विचारले, त्यावेळी हॉटेल मॅनेजर महावीर यादव याने मालक अजून आले नसल्याचे त्यांना सांगितले.

काही वेळाने अनुप शेट्टी हॉटेलवर आले व त्यांच्या कॅबिन मध्ये गेले असता काही वेळाने विजय अवकिरकर हा चार अनोळखी व्यक्तीसोबत आला व त्याने सोबत असलेल्या माणसांना कॅबिन बाहेर बसवून अनुप शेट्टीला भेटण्या साठी केबिनमध्ये गेला, त्याने अनुप शेट्टीचा मोबाईल फोन काढून घेऊन त्यांना शिविगाळ करत त्याला कॅबिनमध्ये मारहाण करू लागले. बाहेर उभे असलेले इतर चौघे देखील कॅबिनमध्ये गेले व अनुप शेट्टी यांच्यावर पिस्तुल रोखून बाहेर घेऊन आले व हवेत दोन वेळा गोळीबार करून अनुप शेट्टी यांना त्यांच्याच इनोव्हा मोटारी टाकून त्यांचे अपहरण केले.

हॉटेल व्यवस्थापकाने तात्काळ मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर कॉल करून पोलिसांना कळवले. काही वेळातच एमआयडीसी पोलिसांनी हॉटेल विरा रेसिडेन्सी येथे धाव घेतली, आणि अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला. दरम्यान अपहरणकर्त्याना हॉटेल मालक अनुप शेट्टी यांच्याकडे त्यांच्या मित्राच्या मार्फत ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली, पोलिसांनी तात्काळ आलेल्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेऊन स्वप्नील अवकिरकर, वैभव जानकर यांना ठाण्यातील रेतीबंदर परिसरातून ताब्यात घेतले.

दरम्यान, अपहरणकर्त्यानी अनुप शेट्टी यांचे ज्या वाहनातून अपहरण केले, त्या वाहनाचा शोध घेत मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शहापूर तालुक्यातील किन्हवली येथून मोटार ठाण्याच्या दिशेने येत असल्याचे कळताच पोलीस पथकाने मोटारीचा पाठलाग करून रस्त्यावर अडथळा निर्माण केला व अपहरण कर्त्याचे वाहन ताब्यात घेऊन हॉटेल व्यवसायिक अनुप शेट्टी यांची सुखरूप सुटका केली. विजय अवकिरकर, चंद्रकांत अवकिरकर, गुरुनाथ वाघे, सागर गांगुर्डे आणि मनोज लोखंडे यांना ताब्यात घेऊन दोन पिस्तुल, दोन चॉपर ताब्यात घेण्यात आले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंनी बारसूची जागा सुचविली आणि आता त्यांचाच विरोध!

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू

वेंगसरकर यांचे योगदान गावस्कर, तेंडुलकरपेक्षाही मोठे

जलतरण करणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धाच्या अंगावर तरुणाने मारली उडी आणि…

ताब्यात घेण्यात आलेले पाच जण आणि ठाण्यातून अटक करण्यात आलेले दोघे असे ७ अपहरणकर्त्याना पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध अपहरण, मारहाण करणे, खंडणी,भारतीय हत्यार अधिनियम कायदा, दंगल,धमकी देणे याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल व्यवसायिक आणि अपहरणकर्ता विजय अवकिरकर यांच्यात पैशावरून वाद होता, यावादातून ही घटना घडली असून सातही आरोपीना अटक करण्यात आली असून उद्या आरोपीना अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा