पाकीटमारांना सापडले हिरे, पण हाती पडल्या बेड्या… कशामुळे?

पाकीटमारांना सापडले हिरे, पण हाती पडल्या बेड्या… कशामुळे?

काही पाकीटमारांच्या हाती लागले होते २४ लाखांचे हिरे मात्र हे हिरे कुणाला कसे विकायचे याची माहिती नसल्यामुळे हे पाकीटमार हिऱ्यांसाठी ग्राहक शोधत असताना पोलिसांच्या तावडीत सापडले. मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने या पाकिटमारांना अटक करून त्याच्याजवळून २४ लाख किमतीची १५० पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.

बोरिवली पश्चिम येथे राहणारे सागर केतनभाई शहा (३८) हे हिरे व्यापारी हिऱ्याची डिलिव्हरी देण्यासाठी निघाले होते, बोरिवलीच्या सागर हॉटेल येथून त्यांनी बेस्ट बसमध्ये चढले. काही वेळाने त्याच्यापाठोपाठ पाच ते सहा जणांची एक टोळी बसमध्ये चढली.

या टोळीतील एकाने ‘साहब आपके खंदेपर कीडा है, असे बोलून हिरे व्यापाऱ्यांचे लक्ष विचलित करून त्याच्याजवळ असणारी हिऱ्याची पिशवी लांबवली. काही वेळाने पिशवी गायब झाल्याचे लक्षात येताच सागर शहा बसमध्ये पिशवी शोधू लागले. हिऱ्याची पिशवी चोरीला गेल्याचे कळताच सागर शहा यांनी थेट बोरिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. बोरिवली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला. हिरे व्यापारी यांच्याकडे हिऱ्याची १५० पाकिटे होती, व त्यात सुमारे २४ लाख किमतीचे हिरे होते.

हे ही वाचा:
छे ! छे !! उद्धव ठाकरे अजिबात वाकले नाहीत…

केंद्राकडे केलेल्या ७-८ मागण्या तर राज्याशी संबंधित

मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती

गांधीजींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत सात वर्षांची शिक्षा

बेस्ट बसमध्ये पाकीटमार, मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीने हे हिरे लांबवले असल्याचा संशयावरून मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने तपास सुरु केला व घटनास्थळ, तसेच बसमधील सीसीटीव्हीच्या आधार घेऊन या चोरांचा शोध सुरु केला. तसेच हे चोर हिरे विकण्यासाठी ज्वेलर्स दुकानात जातील या शक्यतेने पोलिसानी बोरिवली तसेच त्या परिसरात ज्वेलर्स मालकाकडे चौकशी सुरु केली, तसेच हिरे विकण्यासाठी कोणी आले तर लगेच पोलिसांना कळवा अशी सूचना ज्वेलर्स दुकानदारांना देण्यात आली.

दररोज १५ ते २० हजार रुपयाची चोरी करणाऱ्या या पाकिटमाराच्या हाती मोठे घबाड लागले होते, मात्र ते कुणाला आणि कसे विकायचे याचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी नेहमी प्रमाणे ज्वेलर्स दुकानदाराना गाठण्यास सुरुवात केली. हिरे चोरी करणारे हिरे विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच मालमत्ता कक्षाच्या पोलिसानी सापळा रचून या पाकीटमारांना बोरिवली येथून अटक केली.

अनिल तुकाराम गायकवाड उर्फ आन्या (५३) , विशाल अनिल गायकवाड (२७) , अब्दुल जब्बार शेख (३७), संजय उत्तम (४३) आणि सय्यद रफिक अली (५८) या पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या पाचही जणांकडून पोलिसांनी चोरी केलेल्या हिऱ्यांची १५० पाकिटे जप्त केली आहे. या पाकिटमारांना हिरे विकता आले नसल्यामुळे पोलिसांच्या हाती सर्व हिरे लागले आहे.

Exit mobile version