कुरारमध्ये जखमी अवस्थेत सापडलेल्या इसमाचा मृत्यू; ८ तासात आरोपी ताब्यात

कोणताही दुवा नसताना पोलिसांनी आरोपीला पकडले

कुरारमध्ये जखमी अवस्थेत सापडलेल्या इसमाचा मृत्यू; ८ तासात आरोपी ताब्यात

कुरार, मालाड येथे एक इसम जखमी अवस्थेत सापडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तो मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यासंदर्भात पोलिसांनी अवघ्या ८ तासात आरोपीला जेरबंद केले.

कुरार येथील पोलिस गस्त घालत असताना तयांना हर्ष ट्रेडर्ससमोरील फुटपाथजवळ, परी हॉटेलच्या समोर, आप्पापाडा, मालाड येथे एक इसम जखमी अवस्थेत आढळला. तो बेशुद्धाअवस्थेत होता. त्याला तात्काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मनपा रुग्णालय, कांदिवली पश्चिम येथे दाखल करण्यात आले. पण तेथे तपासल्यावर तो मृत असल्याचे स्पष्ट झाले.

या इसमाच्या छातीच्या उजव्या बाजूला शस्त्राने भोसकल्याच्या खुणा दिसत होत्या. त्यानंतर या इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. दीपा दीपक राणे या मयत इसमाच्या आई भेटल्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा संकेश दीपक राणे (२५) याच्यावर कुणीतरी अज्ञात इसमाने हल्ला केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आ. कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४…

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी

या गुन्ह्याच्या नोंदणीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास करण्यास सुरुवात केली. त्यासाठी पोलिस पथके तयार केली गेली. कुरार पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि वानखेडे, पोउनि खरडे यांनी या घटनेतील कोणताही दुवा उपलब्ध नसतानाही. तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला. त्यातून हवा असलेला आरोपी ८ तासाच्या आत पोलिसांच्या हाती सापडला. त्याच्याकडून सदर हत्यार जप्त करण्यात आले. ती लोखंडी पट्टी असून त्याला वेल्डिंग केलेला स्क्रू जोडण्यात आला असल्याचे लक्षात आले.

प्राथमिक स्वरूपात आरोपीकडून माहिती मिळाली की, मयत इसम संकेश राणे आणि आरोपी मनीषकुमार शुक्ला (३०) यांच्यात कचरा वेचण्यावरून जुना वाद होता. या वादाचा राग मनात ठेवून आरोपीनी संकेश राणे याला जीवे मारले.

Exit mobile version