31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाफॉरेन्सिक विभागात १७ वर्षे ‘बनावट’ नोकरी, आता खुनाचा गुन्हा

फॉरेन्सिक विभागात १७ वर्षे ‘बनावट’ नोकरी, आता खुनाचा गुन्हा

पोलिसांनी केली अटक

Google News Follow

Related

राज्यातील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा नाशिक या ठिकाणी लिपिक म्हणून १७ वर्षे नोकरी करणाऱ्या विजयसिंग सोलंकी याला गोध्रा येथील २००३ च्या एका खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर सोलंकीचे पितळ उघडे पडले असून त्याने बोगस कागदपत्रे आणि बोगस पोलीस पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारावर १७ वर्षे फॉरेन्सिक विभागात नोकरी केल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. या प्रकरणी मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात सोलंकी याच्या विरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरी प्रकणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

विजयसिंग सोलंकी हा मूळचा गुजरात राज्यातील गोध्रा येथे राहणारा आहे. २००५ मध्ये तो महाराष्ट्र राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा विभागात नाशिक येथे नोकरीला लागला होता. वाकोला पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत फॉरेन्सिक विभागाचे उपसंचालक पवार यांनी म्हटले आहे की, “सोलंकी हा २००५ पासून संस्थेत लिपिक म्हणून काम करत होते. त्यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता काम करण्याचा अहवाल देणे बंद केले. काही आठवडे गैरहजर राहिल्यानंतर त्यांच्यासमोर एखादी दुर्दैवी घटना घडली असण्याची शक्यता असल्याने, फॉरेन्सिक लॅबचे तत्कालीन उपसंचालक,यांनी नाशिक पोलिसांकडे तक्रार करण्याची विनंती केली.”

 

 

तपासाअंती, पवार यांनी पोलिसांना सांगितले की नाशिकमधील स्थानिक पोलिसांनीच गुजरातमधील त्यांच्या समकक्षांकडून सोलंकीला गोध्रा येथे २००३ च्या एका खुनाच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती दिली. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत रुजू होण्यापूर्वी सोलंकीने हा गुन्हा केल्याचे कळताच तत्कालीन उपसंचालकांनी सोलंकीच्या भरती प्रक्रियेची चौकशी सुरू केली. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने अंतर्गत तपासणी केली आणि शोधून काढले की सोलंकीचे इयत्ता नववीचे मार्कशीट, त्याचा शाळा सोडल्याचा दाखला आणि त्याने फॉरेन्सिक लॅब मध्ये नोकरी सादर केलेले पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र हे सर्व बनावट होते.

 

 

गुजरातमधील शाळेच्या नोंदीनुसार, शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावरील अनुक्रमांक दुसर्‍या विद्यार्थ्याचा होता. शिवाय,१९९४ मध्ये वर्गात केवळ ३९ विद्यार्थी असल्याची पुष्टी शाळेने केली असली तरीही, गुणपत्रिकेवरील रोल क्रमांक ४४ होता. एप्रिल २००५  मध्ये जारी करण्यात आलेला आणि महेलोल गावचे पोलीस अधीक्षकांनी स्वाक्षरी केलेला पीसीसी देखील बनावट असल्याचे आढळून आले,” असे पोलिसांनी सांगितले. गुजरात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर सध्या तुरुंगात असलेल्या सोलंकीवर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा