31 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
घरक्राईमनामाकामगार युनियनचा पदाधिकारी असल्याची बतावणी करून खंडणी वसुली; आरोपीला अटक

कामगार युनियनचा पदाधिकारी असल्याची बतावणी करून खंडणी वसुली; आरोपीला अटक

पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई

Google News Follow

Related

माथाडी कामगार युनियनचा पदाधिकारी असल्याची बतावणी करून अनेकांकडून खंडणी उकळणाऱ्या एकास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष १ ने अटक केली आहे. मोबीन मोहम्मंद शेख वय २३ वर्षे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

६ जूनला मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत असताना कक्ष १ च्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती कक्ष १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ पाटील यांनी सांगितले आहे.

६ जून रोजी दुपारी ३.४३ वाजताच्या सुमारास तक्रारदार भावेश पटेल हा नरिमन पॉंईंट सीआरटू मॉल येथील वर्ल्ड ऑफ वाईन या दुकानात काम करीत असताना त्यांच्या सीआरटू मॉल मधील पहिल्या माळयावरील नवीन हॉटेलचे काम सुरु असलेल्या ठिकाणी एक व्यक्ती विनापरवाना तेथे येवून तो माथाडी कामगार युनियन मधून आल्याचे सांगितले आणि पैसे दया नाहीतर काम बंद पाडून हॉटेलची तोडफोड करुन पेटवून देण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यावेळी सुपरवायझर यांनी घाबरून त्याला १ हजार रोख रक्कम दिली. त्या ठगाने त्याच्या युनियनचा पदाधिकारी संतोष पाटील याचा मोबाईल कमांक ९०८२९३०७५७ वर संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार भावेश अंबालाल पटेल यांनी फोन वरून ५० हजार इतकी रक्कमेची मागणी केली. त्यावरून अज्ञात आरोपीविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३८४,३८५,४४८,३२३,५०६(२) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी मोबीन मोहम्मंद शेख हा आरोपी खार दांडा परिसरात राहतो. अटक आरोपी हा सराईत खंडणीखोर असल्याने तो त्याचे मोबाईल फोन काही वेळासाठीच सुरू ठेवून पुन्हा बंद करित असे. तांत्रिक तपासात आरोपी हा त्याच्या खार दांडा येथील कुटूंबासमवेत न राहता मीरा भाईंदर परिसरात राहत असल्याचे आढळून आले.

त्यानुसार या परिसरात शोध घेतला. तसेच त्याच्याशी संबधित व्यक्तींचा शोध घेवून गुप्तपणे माहिती प्राप्त केली. त्यामध्ये मोबीन हा आरोपी वांद्रे कोर्ट परिसरात येणार असल्याचे समजले. या ठिकाणी गुन्हे शाखेच्या कक्ष-१ चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे आणि त्यांच्या पोलीस पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्वाधिक पेपरफुटी!

प्रज्वल रेवण्णाला कोर्टाकडून आणखी एक झटका, जामीन अर्ज फेटाळला!

काँग्रेसने स्वहस्ते केले तोंड काळे…

मुंबई ‘दरड प्रवण क्षेत्र मुक्त’ करणार!

या आरोपीविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये भारतीय दंड संविधान कलम ३८४, ४५२, ५०६, टिळक नगर पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये भारतीय दंड संविधान कलम ३८५, ३८६, ५०४, ५०६, ५०६ (२) तर २०२२ मध्ये माटुंगा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच २०२० मध्ये देखील आरोपी मोबीन विरोधात सांताक्रुज पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ४५२, ५०६ आणि दुसरा गुन्हा भारतीय दंड संविधान कलम ५०६, १७०,४१९,४२०, ३४ अन्वये दाखल करण्यात आलेला आहे. या सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात कक्ष १ ला यश आले आहे.

अटक आरोपीने ठाण्यातील तनिष्क स्टोअर्स येथून २ लाख तसेच त्यांच्या वाशी येथील तनिष्क स्टोअर्स येथून २ लाख रूपये असे एकूण ४ लाख रूपयांची खंडणी उकळली आहे. वाळकेश्वर येथील दृष्टी क्रियशरचे व्यवस्थापक परेश मिस्त्री यांच्याकडून ८५ हजार, मेकर टॉवर येथून ३० हजार खंडणी उकळल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
162,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा