तब्बल दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा सापडला मंगळसूत्र चोर

डोक्यावर टोपी घालून हे गुन्हे करीत असल्याचे तपासात समोर आले

तब्बल दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा सापडला मंगळसूत्र चोर

रेल्वेमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळणाऱ्या सोनसाखळी चोराला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे. दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा चोरटा रेल्वे पोलिसांच्या हाती लागला आहे.

मोहम्मद अमन मुश्रत हुसैन (३०) मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील मोहम्मद अमन हा काही महिन्यांपूर्वीच नालासोपारा येथे राहण्यास आला होता. मिरा रोड, बोरिवली, वसई रेल्वे स्थानक आणि लोकल ट्रेन मध्ये मागील एका महिन्यात सहा सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. एकापाठोपाठ एक अशा सहा सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिला प्रवासीमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वसई ते बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हे ही वाचा:

पहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार पवार होते, आता सूत्रधार वेगळा असेल….

संजय राऊत म्हणतात, ‘२००० कोटींच्या डील’चे आपण बोललोच नाही!

२४ हजार फुटांवर रेडिओ संपर्क तुटला, अखेर बलजित सापडली

पहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार पवार होते, आता सूत्रधार वेगळा असेल….

सहा ही गुन्हे करणारा सोनसाखळी चोर एकच असल्याचे त्याच्या चोरीच्या पद्धतीवरून समोर आल्यानंतर वसई, बोरिवली रेल्वे पोलिसांच्या पथकाने बोरिवली ते वसई विरार परिसरातील सुमारे दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक व्यक्ती चेहऱ्यावर मास्क लावून तसेच डोक्यावर टोपी घालून हे गुन्हे करीत असल्याचे तपासात समोर आले. मात्र चेहरा मास्कमुळे झाकल्यामुळे आरोपीची ओळख पटत नव्हती.

तपास पथकाने अखेर आरोपीच्या चालण्याची लकब आणि त्याच्या शरीरयष्टीमुळे त्याची माहिती काढण्यात आली असता, तो नालासोपारा येथे राहण्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याला नालासोपारा येथून अटक करण्यात आली असून त्याच्या जवळून सहा मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे.

Exit mobile version