अनंत- राधिका यांच्या लग्नसोहळ्यात बॉम्बस्फोट होणार असल्याचे ट्विट करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

गुजरातमधून पोलिसांनी केली अटक

अनंत- राधिका यांच्या लग्नसोहळ्यात बॉम्बस्फोट होणार असल्याचे ट्विट करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याला देश- विदेशातील मान्यवर उपस्थित होते. कला, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनीही या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोहळ्याला उपस्थित राहत नवदामपत्यास आशीर्वाद दिले होते. दिग्गजांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती. दरम्यान, अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशा आशयाच्या धमकीचे ट्विट एका युवकाने केले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशा आशयाचे ट्विट एका ३२ वर्षीय इंजिनिअर तरुणाने केले होते. तेव्हापासून मुंबई पोलिसांकडून या तरुणाचा शोध सुरू होता. अखेर मुंबई पोलिसांनी गुजरातच्या वडोदरामधून या युवकास अटक केली आहे. त्याचे नाव विरल शहा असे आहे. आरोपी विरल हा ३२ वर्षांचा असून व्यवसायाने इंजिनिअर आहे. अंबानींच्या लग्नसोहळ्यात सगळे व्हीआयपी एकाच ठिकाणी असून बाँबस्फोट होणार, असे ट्विट आरोपी शहा याने केले होते. या ट्विटनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या आणि संबंधितावर गुन्हा दाखल करुन आरोपीच्या मागावरही होत्या. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

खासदार छत्रपती शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखलं !

लोकसभेत पराभूत खासदारांचा अजूनही सरकारी बंगल्यात ठिय्या, बजावली नोटीस !

३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘क्लीन चीट’ !

कवी नारायण सुर्वेंच्या घरात केली चोरी पण, नंतर चोर चिठ्ठी लिहित म्हणाला सॉरी…

अनंत आणि राधिका यांचा लग्नसोहळा चार दिवस सुरू होता. विविध मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला होती त्यामुळे सुरक्षेची मोठी जबाबदारी पोलिसांवर आणि यंत्रणेवर होती. दरम्यान, अंबानींच्या लग्नसोहळ्यासाठी निमंत्रण नसलेल्या दोघांनी लग्नसोहळ्याच्या ठिकाणी हजेरी लावली होती. या दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात दोन जण विना आमंत्रण दाखल झाले होते. विना परवानगी प्रवेश करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीचं नाव व्यंकटेश नरसैया अल्लुरी हा २६ वर्षांचा यूट्यूबर आहे आणि दुसरा व्यक्ती लुकमान मोहम्मद शफी शेख हा २८ वर्षांचा असून तो स्वत:ला व्यापारी असल्याचं सांगत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

Exit mobile version