मालवणीत तो तयार करत होता, सरकारी बोगस कागदपत्रे, एकाला अटक

बनावट सरकारी कागदपत्रे बनवून ती विकत असल्याचे कळले

मालवणीत तो तयार करत होता, सरकारी बोगस कागदपत्रे, एकाला अटक

मालाडच्या मालवणीमध्ये २ हजारात रुपयांमध्ये बोगस आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका इत्यादी सरकारी कागदपत्रे तयार करून देणाऱ्या एकाला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. या मागे मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या टोळीकडून बोगस मतदान ओळ्खपत्रात देखील फेरफार करीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मोहसीन मोहम्मद रफिक शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मोहसीन हा मालाड मालवणी आरएससी गेट क्रमांक ८ येथे राहण्यास आहे.मोहसीन हा एमएचबी कॉलनी, गायकवाड नगर, गेट क्रमांक ८ येथे आधारकार्ड सेंटर, तसेच इतर प्रमाणपत्रे सेंटर चालवत होता. त्याच्या संगणकामध्ये असलेल्या आधारकार्ड, वोटर आयडी, पॅन कार्ड बनवून देण्याचे पोर्टलच्या माध्यमातून मोहसीन हा दोन हजार रुपये घेवून आधारकार्ड मध्ये खोट्या फेरफार, बोगस वोटर आयडी, बोगस पॅनकार्ड तयार हुबेहूब बनवून देत असल्याची माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे सपोनि.निलेश साळुंखे यांना मिळाली होती.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून दुसरी यादी जाहीर!

ठाकरेंना गप्प करणारी जडीबुटी…

“संदेशखालीच्या गुन्हेगारांना त्यांचं संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावं लागेल”

सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!

या माहितीच्या आधारे निलेश साळुंखे यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली या आधार केंद्रावर छापा टाकला असता त्या ठिकाणी काही महिला पुरुष आधार कार्ड तसेच पॅन कार्ड मध्ये फेरफार करण्यासाठी उभे होते.

पोलिस पथकाने चौकशी केली असता मोहसीन हा आधारकार्ड, पॅन कार्ड बनवून देतो अशी माहिती समोर आली. पोलिसांनी मोहसीन ला ताब्यात घेऊन त्याच्याकडील संगणक आणि इतर कागदपत्रे तपासली असता मोहसीन हा आधारकार्ड पोर्टलच्या माध्यमातून आधारकार्ड मध्ये चुकीचे फेरफार करीत असल्याचे समोर आले, तसेच त्याच्या संगणकात वोटर आयडी तयार करण्याचे अप्लिकेशन होते त्यातून तो बनावट वोटर आयडी बनवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे .

पोलिसांनी त्याच्या आधार केंद्रातून संगणक, प्रिंटर, स्कॅनर आणि बनावट आधारकार्ड इत्यादी साहित्य जप्त करून मोहसीन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहसीन बनावट सरकारी कागदपत्रे तयार करून देणारी टोळी चालवत होता, व त्याने अनेकांना बोगससरकारी कागदपत्रे तयार केली असावी तसेच बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रे तयार करून दिले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
,

Exit mobile version