24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामामोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद रेल्वे स्टेशनवरुन मेहरबान हुसैन याला अटक

Google News Follow

Related

हिंदू नाव वापरून महिलेची फसवणूक करून धर्मांतरासाठी सक्ती करणाऱ्या मुस्लिम तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद रेल्वे स्टेशनवरुन मेहरबान हुसैन याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मेहरबानने त्याचे आधारकार्डही मोहन या नावाने तयार केले होते.

मुरादाबाद स्टेशनवर एक हिंदू महिला मुस्लिम तरुणासह ट्रेनची वाट बघत असल्याचे आरएसएसच्या महिलेच्या लक्षात आले. त्यावेळी तिची नजर महिलेच्या हातावर गेली असता तिला हातावर ओम गोंदवलेला दिसला. त्यानंतर तरुणाशी आरएसएसच्या महिलेने संवाद साधला तेव्हा तो मुस्लिम असल्याचा संशय तिला आला. सुरुवातीला त्याने मोहन नाव असल्याचं सांगितलं मात्र, त्याला फोन आला तेव्हा त्याने आपण मेहरबान बोलत असल्याचं सांगितलं. तेव्हा काहीतरी गडबड असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. या महिलेने पोलिसांना संपर्क केला आणि सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर मोहन उर्फ मेहरबान हुसैनला अटक करण्यात आली. मेहरबान हुसैनच्या विरोधात भोट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक! पुतण्याने बॉलला हात लावला म्हणून काकाचे बोट कापले

अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवणाऱ्या चार जणांना अटक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरीनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित!

किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण! अडीच लाख शिवभक्त जमले

प्रकरण काय?

मुरादाबादमधील रामपूरच्या भोट गावात एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने त्याचं नाव मोहन असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. पुढे या तरुणीला त्याचे नाव मोहन नसून मेहरबान असल्याचे समजताच तरुणीने त्याच्याशी असलेले संबंध संपुष्टात आणले. मात्र, मेहरबान याने तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली. मेहरबान हुसैन हा महिलेला कलियर शरीफ या ठिकाणी घेऊन चालला असताना त्याला अटक करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा