27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाअमित शहांच्या दौऱ्यावेळी तोतयागिरी करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अमित शहांच्या दौऱ्यावेळी तोतयागिरी करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सोमवार, ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते.

Google News Follow

Related

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सोमवार, ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. दरम्यान, मुंबई पोलिसांनी अमित शहांच्या दौऱ्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, अमित शहा यांच्या ताफ्याच्या आसपास एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला होता. अखेर या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

अमित शाह हे मुंबईत आले असताना ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान ‘वर्षा’ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवास्थान ‘सागर’ येथे देखील गेले होते. तेव्हा या परिसरात एक व्यक्ती कोट, टाय आणि सरकारी ओळखपत्र घालून वावरत असलेला आढळून आला होता. मुंबई पोलिसांनी त्याला विचारले असता आपण केंद्रीय गृमंत्रालयाचे अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. मात्र, नंतर तो घटनास्थळावरून निघून गेल्याचे लक्षात आले.

सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी हा माणूस संशयित असल्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यानंतर नाना चौक परिसरातून खबऱ्याच्या मदतीने या व्यक्तीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. तपासातून हा व्यक्ती सरकारी अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून बनावट खासदार सचिवचे ओळखपत्र सापडले आहे. हा तरुण मुळचा धुळे येथे राहणारा असल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा:

अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर

सर्वांनी सीट बेल्ट बांधा नाहीतर समजा झालाच वांधा

कर्मचाऱ्याने स्वतःच्याच कार्यालयात घातला दरोडा; अशी पकडली गेली चोरी

तिने आपल्या लहानग्याला वाघाच्या जबड्यातून खेचून आणले

गिरगाव न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून हा तोतया तिथे काय करत होता याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा