मुंबईत चोरलेल्या मोबाईल फोनची परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीतील एका सदस्याला गुन्हे शाखेच्या कक्ष ६ च्या पथकाने ग्रांट रोड येथून अटक केली आहे. त्याच्या जवळून गुन्हे शाखेने १३५ स्मार्ट फोन आणि दुचाकी असा २२ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखाने महिन्याभरापूर्वी मुंबईत चोरलेल्या मोबाईल फोनची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीतील मुख्य म्होरक्यासह दहा जणांना अटक केली होती.त्यांच्याजवळून सुमारे ४९६ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले होते. अटक करण्यात आलेली ही टोळी मोबाईल चोरीपासून हे मोबाईल फोन परराज्यात अगदी नेपाळ बांगलादेशात त्यांची विक्री करीत होती.
हे ही वाचा:
पुण्यात १३-१४ ऑगस्टला रंगणार मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवल
‘मुंबई पालिकेला भ्रष्टचारमुक्त करणार’
आमदार निघून गेले आता नगरसेवकांना साकडे
या टोळीचा छडा लावल्यानंतर या टोळीतील आणखी काही सदस्य बाहेर असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे कक्ष६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ग्रांट रोड येथून एकाला १३५ चोरीच्या मोबाईल फोनसह अटक केली आहे.