चेंबूर येथील गोळीबार प्रकरणात मुख्य शूटर्ससह सूत्रधाराला अटक

मुख्य सुत्रधाराला नया नगर येथून अटक

चेंबूर येथील गोळीबार प्रकरणात मुख्य शूटर्ससह सूत्रधाराला अटक

बांधकाम व्यवसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटर्ससह मुख्य सुत्रधाराला धारावी आणि मीरारोड परिसरात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई परिमंडळ ६ चे पथक आणि मुंबई गुन्हे शाखेने केली आहे. फिरोज बदरुद्दीन खान (५४) आणि अफसर खान (२०) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

फिरोज खान हा या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असून अफसर हा शूटर्स आहे.फिरोज खान ला मुंबई गुन्हे शाखेने मीरा रोड येथील नया नगर येथून तर अफसर ला धारावी येथून परिमंडळ ६ च्या पथकाने अटक केली आहे. हा हल्ला संपत्तीचा वाद आणि पूर्ववैमनस्यातून करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारात बांधकाम व्यवसायिक हा सुदैवाने वाचला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील बेलापूर येथे राहणारा सदरुद्दीन खान हा बांधकाम व्यवसायिक हा बुधवारी रात्री त्याच्या डिफेडर या आलिशान मोटारीतून धारावी येथून पनवेलच्या दिशेने जात असताना रात्री ९:५० च्या सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांपैकी एकाने चेंबूर डायमंड गार्डन सिग्नल जवळ सदृद्दीन खान यांच्यावर गोळीबार करून पळ काढला होता.

या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी परिमंडळ ६ चे एक पथक तयार करण्यात आले होते, तसेच मुंबई गुन्हे शाखेने देखील एक पथक तयार करण्यात आले होते. परिमंडळ ६ पथकाने या हल्ल्यातील शूटर्स अफसर खान याला धारावी येथून अटक करण्यात आला होता, तर या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार फिरोज खान याला गुन्हे शाखेने नया नगर येथून शुक्रवारी अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

पाचव्या पराभवानंतर धोनीचा पारा चढला!

संदीप शर्मा कोहलीला पुन्हा ‘मामा’ बनवणार!

तांत्रिक बिघाडानंतर डिजिटल पेमेंट सेवा सुरू

सुखबीर सिंग बादल पुन्हा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जखमी झालेला सदरुद्दीन खान, आरोपी फिरोज खान आणि शूटर अफसर खान हे तिघे उत्तर प्रदेशातील फतेहपुर येथे राहणारे आहे. हल्ल्यातील कटाचा मुख्य सूत्रधार फिरोज खान आणि जखमी बांधकाम व्यवसायिक सदरुद्दीन खान हे बांधकाम व्यवसायात भागीदार होते.

या दोघांनी मीरा रोड, कल्याण शिळफाटा येथे जमीन विकत घेऊन डेव्हलपमेंट सुरू केली होती. त्यात त्यांचा वाद होऊन दोघे वेगळे झाले होते. तसेच गावी त्या दोघांमध्ये जुना वाद देखील होता, त्यातून हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ला करताना मुख्य सूत्रधार फिरोज हा स्वतः मोटारसायकल चालवत धारावी पासून सदृद्दीन खान याचा पाठलाग करीत होता आणि अफसर हा मागे बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version