तामिळनाडू राज्यातील मौल्यवान हिरे व्यापाऱ्याला मुंबई विमानतळावर लुटणाऱ्या टोळीतील महिलेला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली महिला आणि तीची टोळी कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.व्यापाऱ्याकडून लुटण्यात आलेली २६ लाखाची रोकड घेऊन पळून गेलेल्या इतर दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
सलमा बानू असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ३० मे रोजी तामिळनाडू राज्यातील हिरे आणि मौल्यवान खड्याचे व्यापारी सौरभ सज्जाद हुसैन (३२) हे कर्नाटक राज्यात व्यापार करून मुंबईत आले होते व मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले होते, गुरुवारी रात्री व्यापाऱ्याच्या दोन मैत्रिणी मुंबई विमानतळा वरून दुबई येथे जाणार असल्या मुळे हुसेन हे त्यांना भेटण्यासाठी रात्री मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते,त्याच्या सोबत असलेल्या बॅगेत २५ हजार अमेरिकन डॉलर आणि २५ हजार दिरहम हे परदेशी चलन होते.
रात्री ते विमानतळावर मैत्रिणीची वाट पहात असताना दोन अनोळखी पुरुषआणि एक महिला त्यांच्याकडे आली, व त्यांनी स्वतःची ओळख सीमाशुल्क अधिकरी असल्याचे सांगून तुमच्याकडे चौकशी करायची आहे, असे सांगून हुसेन यांना विमानतळा जवळील बागेत घेऊन आले.व त्यांच्याकडे परकीय चलन असल्याचे सांगून बॅग स्कॅनिग करायची असल्याचे सांगून हुसेन याच्या जवळील परकीय चलन असलेली बॅग एका व्यक्तीने स्कॅन करण्याच्या नावाखाली घेऊन गेला, व महिला व एक पुरुष हुसेन याच्यासोबत थांबले.
हे ही वाचा:
ओदिशात कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात; शेकडो लोक जखमी, ५० दगावल्याची भीती
भारताच्या गगनयान मोहिमेत अंतराळवीरांच्या मेनूत ‘इडली’ नाही
अमित शहा इशारा दिल्यानंतर मणिपूरचे बंडखोर आले शरण, १४० शस्त्रे परत
उत्तन समुद्रकिनाऱ्यावर सापडला शीर नसलेला महिलेचा मृतदेह
काही वेळाने बहाणा करून दोघे जण तेथून निसटण्याचा प्रयत्न करू लागले, हुसेन यांना संशय येताच त्यांनी या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करतात महिलेसोबत असलेला पुरुष हा तेथून निसटला आणि हुसेन हे या महिलेला घेऊन सहार पोलिस ठाण्यात आले. व त्यांनी झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली असून तिचे नाव सलमा बानू असे असून ती कर्नाटक राज्यात राहणारी आहे. सलमा बानू आणि तिचे दोन सहकारी हुसेन यांचा कर्नाटक पासून पाठलाग करीत मुंबईत आले होते अशी माहिती तपासात समोर आली.पोलिस तिच्या दोन साथीदारांचा कसून शोध घेत आहे.