आशिष शेलारांच्या पीएच्या नावाने फसवणूक करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वकिलाला घातला आठ हजारांचा गंडा

आशिष शेलारांच्या पीएच्या नावाने फसवणूक करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबईतून सायबर क्राईमची एक घटना समोर आली आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या नावाने ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आशिष शेलार यांचे पीए यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

जगभरात सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असून फेक फोन कॉल्स, खोट्या ओळखी, पोलिसांच्या नावे संपर्क करणे असे प्रकारा सर्रास घडताना दिसत आहेत. अशी एक फसवणुकीची घटना मुंबईतून उघडकीस आली आहे. एका आरोपीने मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांचा पीए असल्याचे भासवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने वकील आणि त्याच्या क्लायंट्सच्या नातेवाईकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आशिष शेलार यांचे पीए नवनाथ सातपुते यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एबीपी माझा ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

माहितीनुसार, नवनाथ सातपुते यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या कारवाईदरम्यान आरोपीला अटक केली आहे. आमिन इरफान बेंद्रेकर (२६ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हे ही वाचा:

मध्यप्रदेश; ब्लकमेल करून अत्याचार करणाऱ्या नफीजच्या घरावर बुलडोजर !

चिमुरडी पुन्हा लक्ष्य; कांदिवली समतानगरमध्ये लिंगपिसाट रहीम पठाणला अटक, मानखुर्दमध्येही अत्याचार

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा !

बंद दाराआड ते चार भिंतीआड; एक सडलेला प्रवास…

अटकेत असलेल्या आरोपीने एका वकिलांना फोन करून त्यांच्या क्लायंटचा तुरुंगात असलेला नातेवाईक घसरून पडला आहे, अशी बतावणी केली. तसेच त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले असून त्याच्या उपचारासाठी आठ हजार रुपये लागत असल्याचे सांगत त्याने पैसे उकळले होते. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे १४ गुन्हे दाखल आहेत. सध्या वांद्रे पोलिसांनी या आरोपीला अटक करून अधिक तपासाला सुरुवात केली आहे.

Exit mobile version